
मुंबई : कोकणातील चाकरमानी दरवर्षी न चुकता गणपती, होळी अशा सणांना हटकून गावी जातोच जातो. पूर्वी गावी जाण्यासाठी लाल परी एसटी हेच एक माध्यम होते. परंतू , कोकण रेल्वे सुरु झाली आणि चाकरमान्यांचा लांबपल्ल्याचा प्रवास वाचला, पैसे वाचले आणि वेळही वाचला. कोकणासाठी कोकण रेल्वे फायद्याची ठरेल असे वाटत होते. पण, चाकरमान्यांचे होणारे हाल काही चुकले नाहीत. आताही कोकणाचा मोठा उत्सव म्हणजे गणपती हा सण अवघ्या तीन – चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबईकर चाकरमान्यांनी गणपतीमध्ये गावी जाण्यासाठी 400 च्यावर वेटिंगची रेल्वे तिकीटे देऊ नयेत अशी महत्वाची मागणी केली आहे. कोकण रेल्वेला सर्वाधिक जमीन महाराष्ट्राने दिली. परंतू, कोकण रेल्वेचा फायदा महाराष्ट्राला कमी तर दक्षिणेकडील राज्यांनाच अधिक होत आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या स्थानकांवर सोयी सुविधा नाहीत, मार्गांचे दुपदरीकरण रखडले आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून महाराष्ट्रावर जो अन्याय सुरु आहे तो आजही तसाच कायम आहे. कोकणातील डोंगर, दऱ्या, नदी अशी विविध कारणे देत कोकण रेल्वे 30 वर्ष झाली तरी आजही आचके...