Ladki Bahin Installment: यंदा 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार, सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी

Ladki Bahin Installment Rakshabandhan: दर महिन्याला लाडकी बहिणीचे पैसै महिलांच्या खात्यात जमा होतात, यंदाही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. पण हप्ता 1500 चा नसणार.

Ladki Bahin Installment: यंदा 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार, सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी
| Updated on: Aug 17, 2026 | 12:29 PM

Laadki Bahin Yojana: दर महिन्याला लाडकी बहिणीचे पैसै महिलांच्या खात्यात जमा होतात, काहीवेळाला एखादा हप्ता जमा व्हायचा राहून जातो असा आरोपही बऱ्याचदा अनेक महिलांनी केला आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता या महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळी दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांचा जास्त फायदा होणार आहे. कारण त्यांना 1500 रुपये मिळणार नसून या महिन्यात रक्षाबंधन असल्यामुळे सरकार वाढीव रक्कमही देणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव रक्षाबंधनानिमित्त लाडली बहनांच्या लार्भाथींना मोठी भेटवस्तू देणार आहेत. 19 ऑगस्ट रोजी, ते मैहर जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडली बहना योजनेअंतर्गत 1,500 रुपये हस्तांतरित करतील. इतकेच नाही, तर मुख्यमंत्री त्यांच्या खात्यात अतिरिक्त 250 रुपये देखील पाठवतील. या महिन्यात लाडली बहना महिलांच्या खात्यात एकूण 1750 रुपये जमा केले जातील.

मुख्यमंत्र्यांच्या लाडली बहना महिलांना भेटवस्तू देण्याची तारीखही जवळ येत आहे. मैहरमधील कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री 1.25 कोटींहून अधिक लाडली बहना महिलांना पुढील हप्ता हस्तांतरित करतील. हा सरकारचा 39 वा हप्ता असेल. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी 12 जुलै रोजी 1.25 कोटींहून अधिक लाडली बहना महिलांच्या खात्यात गेल्या महिन्याची रक्कम हस्तांतरित केली. त्यांनी भिंडमधील लहर येथून योजनेचा हप्ता वितरित केला आणि थेट महिलांच्या खात्यात 1,835 कोटी रुपये हस्तांतरित केले. त्याचवेळी, मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा’ या सरकारी योजनेच्या शुभारंभाची घोषणा केली.

आता महाराष्ट्रात दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार आहेत. म्हणजेच थेट तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात येणार आहेत. यामुळे रक्षाबंधनाच्या शुभ मुहुर्तावर लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठी ओवाळणी मिळणार आहे. मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींना कमीच पैसे देत आहेत. 250 रुपयांचा तोटा हा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना बसणार आहे.

पैसे खात्यात जमा झाले की नाही कसं तपासाल?

तुम्हाला तुमच्या लडकी बहिण योजनेचे पेमेंट मिळाले आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ओटीपी वापरून अधिकृत लडकी बहिण पोर्टलवर लॉग इन करा. डेशबोर्डवर ट्रानझेकशन हिस्ट्री दिसेल, तिथे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले की नाही ते तपासा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us