महिला पोलिसाचं लांछनास्पद कृत्य, यूट्यूब – इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ, वसूल केली मोठी रक्कम, नेमकं प्रकरण काय?

नागरिकांचे रक्षकच करतायेत लांछनास्पद कृत्य, महिला पोलिसाच्या यूट्यूब - इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ, कशी वसूल केली मोठी रक्कम... नेमकं प्रकरण काय? धक्कादायक प्रकरण समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे.

महिला पोलिसाचं लांछनास्पद कृत्य, यूट्यूब - इन्स्टाग्रामवर अश्लील व्हिडीओ, वसूल केली मोठी रक्कम, नेमकं प्रकरण काय?
| Updated on: Aug 17, 2026 | 10:09 AM

मेरठे येथे आपत्तीजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक अनू यांनी निलंबित केलं आहे. अनू यांच्यावर गंभीरा आरोप करण्यात आले आहेत. अनू यांचं यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर एका ‘एनी’ नावाचं अकाउंट आहे आणि या सोशल मीडियावर अकाउंटवर महिला पोलीस अधिकारी अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड करायच्या. एवढंच नाही तर, व्हिडीओवर त्यांनी कथित रित्या क्यूआर कोड देखील लावलेला. ज्यामध्यमातून अनू मोठी रक्कम आकारायच्या. प्रकरण समोर आल्यानंतर अन्य पोलिसांनी प्रकरणाची कसून चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पोलीस पोलीस कार्यालयात तैनात होती. त्याच्या नावाने सुरु असलेल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही अपत्तीजनक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

मेरठ येथील महिला पोलीस अधिकाऱ्याचं लांछनास्पद कृत्य

संबंधित व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. व्हायरल पोस्टमध्ये मुख्यमंत्री योदी आदित्यनाथ आणि डीजीपी उत्तर प्रदेश राजीव कृष्ण यांना देखील टॅग करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं आहे. अनू असं कृत्य करत आहेत, अशी माहिती समोर येताच, मेरठ पोलिसांनी गुपचूप चौकशी करण्यास सुरुवात केली.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अनू यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनू यांना त्यांच्या पदावरुन तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. आता याप्रकरणाची जबाबदारी सीओ सौम्या सिंह यांना सोपावली आहे.

पोलीस अधीक्षक अवनीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाच्या सोशल मीडिया धोरणाचं उल्लंघन केल्यामुळे निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. संबंधित उपनिरीक्षकाविरुद्ध विभागीय चौकशीचेही आदेश देण्यात आले असून, त्या चौकशीच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

सांगायचं झालं तर, कही दिवसांपूर्वी केरळमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोटो आणि आवाज यांच्यात फेरफार करून तयार केलेल्या बनावट ‘एआय’ जनरेटेड व्हिडिओचा वापर करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आलं. त्यामुळे संबंधित प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us