ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरांचा नवा फंडा, सरकारी एजन्सी एनपीसीआयचा सावधानतेचा इशारा

| Updated on: Feb 18, 2021 | 5:11 PM

ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरांचा नवा फंडा, सरकारी एजन्सी एनपीसीआयचा सावधानतेचा इशारा (Large increase in the incidence of online fraud)

ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरांचा नवा फंडा, सरकारी एजन्सी एनपीसीआयचा सावधानतेचा इशारा
ऑनलाईन फसवणुकीसाठी चोरांचा नवा फंडा
Follow us on

नवी दिल्ली : एसएमएसच्या नावाखाली फसवणुकीच्या घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीसीआयने लोकांना या फसवणुकीबद्दल सावधानीचा इशारा दिला आहे. ऑनलाईन वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे, त्यामुळे अशा घटनाही समोर येत असल्याचे एनपीसीआयने सांगितले. एनपीसीआयने लोकांना सुरक्षित बँकिंग करीत फसवणूक टाळण्याचे आवाहन केले आहे. (Large increase in the incidence of online fraud)

काय म्हणाले एनपीसीआय?

लोक दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहार स्वीकारत असल्याने एसएमएसच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी सेफ बँकिंग करा आणि अनव्हेरीफाईड लिंक्सवर क्लिक करु नका. अनव्हेरीफाईडचा अर्थ ज्या मॅसेजमध्ये सेंडर कोण आहे हे कळत नाही. त्या मॅसेजपासून सावध राहिले पाहिजे. संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यास सांगणारे बरेच फेक मॅसेज आजकाल येत आहेत. लिंकवर क्लिक करताच हॅकर्सकडे आपली खासगी माहिती जाते आणि यामुळे अकाऊंटमध्ये जमा पैसे चोरी होण्याचा संभव असतो.

खासगी माहिती शेअर करु नका

अज्ञात सोर्सवरुन मॅसेज आल्यास त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. जर मॅसेजमध्ये तुमच्याकडे ओटीपी, सीव्हीव्ही किंवा कार्डची डिटेल मागितली तर सावध व्हा. मॅसेजमध्ये अनव्हेरीफाईड लिंक्सही पाठवण्यात येतात. मात्र यावर क्लिक करु नका, असा सावधगिरीचा इशारा एनपीसीआयकडून देण्यात आला आहे.

ऑनलाईन फसवणुकीचा धोका

देशात ऑनलाईन आणि सायबर गुन्हेगारीसंबंधित घटना समोर येत आहेत. नुकतेच झारखंडमधील देवघर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरूद्ध सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून 11 सायबर गुन्हेगारांना अटक केली. ऑनलाईन फसवणुकीचा धोका इतका वाढला आहे की बँकांकडून अनेकदा ग्राहकांना त्यांची माहिती फोन किंवा मेसेजवर कोणत्याही अज्ञात स्रोतांकडून न देण्याबात जनजागृती करण्यात येतेय.

लसीकरणाच्या नावे होतेय फसवणूक

कोविड लसीकरणाच्या नावाखाली फसवणुकीची नवीन प्रकरणे मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कोविड-19 या लसीकरणाच्या नावाखाली फोन कॉल्स, ई-मेल, व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडिया फोरमच्या माध्यमातून कुणालाही आधार नंबर वगैरे आपली वैयक्तिक माहिती उघड न करण्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे. सायबर गुन्हेगार या माध्यमातून फसवणूक करु शकतात. लसीकरण नोंदणीच्या नावाखाली लोकांना फोन करून सायबर गुन्हेगार वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाप्रकारे वैयक्तिक माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना ओटीपी शेअर करण्यास सांगितले जाते. ओटीपी प्राप्त होताच आधार नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यातून ही रक्कम साफ केली जाते. (Large increase in the incidence of online fraud)

 

 

संबंधित बातम्या

दक्षिण आफ्रिकन महिलेकडून 9 कोटींचं हेरॉईन जप्त, मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई

पोलीस अधिकाऱ्यांची घरं दरोडेखोरांच्या निशाण्यावर, धुळे डीव्हायएसपींच्या घरातून सहा लाखांचा ऐवज लंपास