
देशभरात अनेक ठिकाणी चोऱ्या होत असतात. हे दरोडेखोर या चोऱ्या करण्यासाठी आधी संपूर्ण अभ्यास करतात. चोरी कधी करायची, कुठे करायची, कोणत्या वेळी करायची, त्यानंतर तिथून बाहेर कसे पडायचे या सगळ्याचा विचार ते आधीच करतात. पण सध्या देशात एका महिल्यांच्या टोळीची चांगलीच चर्चा रंगली आहे. ही ‘लेहंगा गँग’ क्षणार्धात चोरी करुन निघून जाते. पोलिसांना त्यांची चोरी करण्याची पद्धत कळाल्यानंतर धक्काच बसला आहे.
ही घटना राजस्थानच्या सनसिटी जोधपूरमध्ये घडली आहे. ही टोळी सध्या ज्या प्रकारे चोरी करत आहे ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. ही सामान्य चोरी करणारी टोळी नाही, तर महिलांची एक धूर्त ‘लेहंगा गँग’ आहे. ही गँग तुमच्या समोर उभी राहून क्षणार्धात हजारो रुपयांचा माल पळवून नेते. सांगरिया बायपास येथील एका ग्रॉसरी स्टोअरमध्ये झालेल्या ताज्या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
या गँगच्या चोरीची पद्धत बॉलिवूड थ्रिलर सिनेमासारखी आहे. आरोपी महिलांनी त्यांच्या पारंपरिक जड लहानांच्या आत विशेष प्रकारचे मोठे खिश्ये आणि पिशव्या शिवल्या आहेत. या महिला गटबद्ध ग्राहक बनून शोरूम किंवा डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये घुसतात. दुकानदार एका महिलेला माल दाखवण्यात व्यस्त असताना, तेव्हा दुसऱ्या सोबत असलेल्या महिला मौल्यवान माल जसे देशी तूपाचे डब्बे, महागडे ड्राय फ्रूट्स आणि कॉस्मेटिक्स उचलून लेहंग्याच्या आतल्या ‘गुप्त’ खिशांमध्ये टाकतात.
लेहंग्यातून खाली पडला देशी तुपाचं डब्बं
पार्श्वनाथ सिटीतील ‘ग्रीन ग्रॉसरी स्टोअर’मध्येही या महिलांनी असाच खेळ करून सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचा माल पळवला. चोरी करून बाहेर पळत असताना एका महिलेच्या लेहंग्याच्या खिश्यातून तुपाचा एक डब्बा अचानक रस्त्यावर पडला. तिथून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाला लगेच प्रकार समजला आणि त्याने दुकानदाराला आवाज दिला, पण तोपर्यंत महिला टॅक्सीत बसून फरार झाल्या होत्या. तिथे त्यांचा एक पुरुष साथी आधीच उभा होता.
सीसीटीव्हीने उघड केलं सत्य
दुकानदाराने सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा तो हादरला. कॅमेऱ्याच असे दिसलं की, महिलामाल उचलतात आणि लगेच तो माल त्यांच्या कपड्यांच्या आत गायब होतो. फुटेजमध्ये महिलांचे चेहरे आणि पळून जाणाऱ्या टॅक्सीचा नंबर स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांची इशारेवारी: शहरात अशा अनेक गँग सक्रिय
जोधपूर पोलिस कमिशनरेटने शहरातील व्यापाऱ्यांना अलर्ट जारी केला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की ही एक संघटित टोळी आहे जी गर्दीच्या भागांना लक्ष्य करते. पोलिसांनी टॅक्सी नंबरावरून छापा टाकायला सुरुवात केली असून, लवकरच ‘लेहंगा गँग’ कोठडीत जाईल असा दावा केला आहे.