पैसे नाहीत, मग मुलीला पाठव… लोकपालाची गरीबाकडे चीड येईल अशी मागणी
गरीबाच्या वाट्याला अनेक अडचणी असतात.. आता देखील असंच काही घडलं आहे. कुटुंबाच्या गरिबीचा फायदा घेत, लोकपालाने अशी मागणी केली. ज्यामुळे तुम्हाला देखील चीड येईल... कुटुंबियांनी पैसे नसल्याचं सांगितल्यानंतर, लोकपाल म्हणाला, 'पैसे नाहीत, मग मुलीला पाठव...'

एका कुटुंबियांच्या गरिबीचा फायदा घेत, एका लोकपालाने मुलीकडून विचित्र मागणी केली. उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका सरकारी अधिकाऱ्यानेच गरीब कुटुंबाकडून विचित्र मागणी केली आहे. सरकारी अधिकाऱ्याने एका गरीब कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत त्यांच्या मुलीबाबत एक मागणी केली. लालगंज तहसील क्षेत्रातील एका लेखपालाने, त्या गरीब कुटुंबाला सरकारी मदत मिळवून देण्याच्या बदल्यात सुरुवातीला लाचेची मागणी केली. गरिबीमुळे पैसे देणं शक्य नसल्याचं त्या कुटुंबाने कळवल्यावर, त्या अधिकाऱ्याने अत्यंत लज्जास्पद वर्तन केलं; त्याने कुटुंबियांना सांगितलं की, जर त्यांना काम करून घ्यायचं असेल, तर त्यांनी आपली मुलगी त्याच्याकडे पाठवावी.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, तहसील क्षेत्रातील एका गरीब कुटुंबाला सरकारी मदतीची गरज होती. या प्रकरणाबाबत रिपोर्ट तयार करण्याची जबाबदारी स्थानिक लेखपाल यांच्यावर सोपवण्यात आली होती. असा आरोप आहे, रिपोर्ट, तयार करण्याच्या बदल्यात त्या अधिकाऱ्याने कुटुंबाकडे पैशांची मागणी केली. पीडित कुटुंबाचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या महिलेने आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा त्या अधिकाऱ्याने तिला आपली मुलगी त्याच्याकडे पाठवण्याची मागणी केली.
तक्रार ऐकताना एसडीएम हसत राहिले
लेखपालाने मुलीबद्दल असं गैरवर्तन केल्यानंतर कुटुंबिय संतापले आणि त्यांनी लेखपालाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्या कुटुंबाचा आरोप आहे की, जेव्हा ते आपली तक्रार सांगण्यासाठी एसडीएम यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याऐवजी हसण्यावारी नेलं. दरम्यान, हे प्रकरण काँग्रेस पक्षापर्यंत पोहोचल्यावर, त्या मुलीची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ ‘एक्स’ ) वर समोर आला आणि ज्यामुळे खळबळ उडाली.
काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा..
दरम्यान, काँग्रेसने ‘एक्स’वर पीडितेच्या कुटुंबाचा व्हिडिओ पोस्ट करत उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर टीका केली आहे. योगींच्या राजवटीत कायद्याचं राज्य आणि माणुसकी या दोन्ही गोष्टींचा ऱ्हास होत असून, रायबरेलीतील ही घटना त्याचा अत्यंत भयावह पुरावा असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. गरिबीमुळे उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाच्या हतबलतेचा गैरफायदा घेत, दिनेश कुमार सविता या स्थानिक महसूल अधिकाऱ्याने मदत मिळवून देणारा रिपोर्ट सादर करण्याच्या बदल्यात एक अत्यंत लज्जास्पद आणि अंगावर काटा आणणारी मागणी केली. समोर आलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.