Sayoni Ghosh : ‘मेरे दिल में है काबा और..’ हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का

Sayoni Ghosh : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक सुरु असताना आणि निवडणूक संपल्यानंतर एक महिला खासदार सोशल मीडियावर भरपूर चर्चेत होती. तिला भरपूर ट्रोलही करण्यात आलं. 'मेरे दिल में है काबा और आंखों में मदीनाट' गाणं गाणाऱ्या सयानी घोष यांनी पलटी मारली आहे.

Sayoni Ghosh : मेरे दिल में है काबा और.. हे गाणं गाऊन बंगाल निवडणूक गाजवणाऱ्या सयानी घोषची पलटी, ममता बॅनर्जी यांना धक्का
Sayoni Ghosh
Image Credit source: Facebook
| Updated on: Jun 10, 2026 | 1:05 PM

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. कुठल्याही निवडणुकीपेक्षा ही परीक्षा खूप मोठी आहे. कारण जो तृणमुल काँग्रेस पक्ष त्यांनी बनवला, त्याचे डोळ्यासमोर तुकडे पडत चालले आहेत. आधी तृणमुल काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडली. 55 पेक्षा जास्त आमदारांनी स्वतंत्र चूल मांडण्याचा निर्णय घेतला. आता टीएमसी संसदीय पक्षात फूट अटळ दिसत आहे. तृणमुल काँग्रेसच्या 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत वेगळी व्यवस्था देण्याची मागणी केली आहे. यात सयानी घोष या खासदाराचं सुद्धा नाव आहे. स्पीकर ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात सयानी घोषची सुद्धा स्वाक्षरी आहे. सयानी घोषने बंडखोरांसोबत जावं हा ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

सयानी घोष या पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध बंगली अभिनेत्री, गायिका आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदार आहेत. सध्या जादवपूर संसदीय क्षेत्राचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी ‘मेरे दिल में है काबा और आंखों में मदीनाट’ हे गाणं त्यांनी गायलं होतं. हे गाणं वादग्रस्त ठरलं होतं. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना या गाण्यासाठी ट्रोल केलेलं.

‘मी चड्ढा नाही, जी चड्डी बनेनं

भाजप नेत्यांनी सयानी घोषच्या याच गाण्यावरुन ममता बॅनर्जी यांना टार्गेट केलं होतं. मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाचे ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले होते. तृणमुल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. यात सयानी घोष सुद्धा आहे. आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राघव चड्ढावर सयानी घोष यांनी एका निवडणूक प्रचारसभेत निशाणा साधला होता. ‘मी चड्ढा नाही, जी चड्डी बनेनं. घोष नेहमी घोष राहणार’ असं सयानी घोष यांनी म्हटलं होतं. सायोनीच्या या वक्तव्यावर भाजपने टीका केली होती.

 

Follow Us