AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याच्या ग्लासामध्ये 10 रुपयांचं नाणं टाकून लोकं तो फ्रिजमध्ये का ठेवतायेत? तुम्ही म्हणाल आतापर्यंत अशी ट्रिक आम्ही पाहिलीच नव्हती

सध्या एक नवी ट्रिक चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक एका पाण्याने भरलेल्या ग्लासमध्ये दहा रुपयांचं नाणं टाकून तो ग्लास फ्रिजमध्ये ठेवत आहेत. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे, का? यामागे नेमकं काय कारण असू शकतं?

पाण्याच्या ग्लासामध्ये 10 रुपयांचं नाणं टाकून लोकं तो फ्रिजमध्ये का ठेवतायेत? तुम्ही म्हणाल आतापर्यंत अशी ट्रिक आम्ही पाहिलीच नव्हती
फ्रिजमध्ये दहा रुपयांचं नाणं काय ठेवलं जातं?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 13, 2026 | 5:39 PM
Share

अनेकदा असं होतं की लाईट गेल्यामुळे तुमच्या घरातील फ्रिजचं कुलिंग कमी होतं आणि त्यामध्ये असलेले अन्नपदार्थ खराब होतात. आपण कुठे बाहेर फिरण्यासाठी जाणार असू तर आपण घरात जेवढे काही अन्नपदार्थ किंवा इतर वस्तू आहेत, त्या सुरक्षित राहाव्यात उष्णतेमुळे खराब होऊ नयेत, यामुळे आपण त्या सर्व गोष्टी फ्रिजमध्ये ठेवतो आणि बाहेर जातो. मात्र जेव्हा आपण बाहेर गावी असतो, किंवा कुठे कामानिमित्त बाहेर गेलेलो असेल, तेव्हा देखील लाईट जाऊ शकते, अशावेळी लाईट जर जास्त वेळ गेली तर फ्रिजचं कुलिंग कमी होतं, बर्फाचं पाणी होतं आणि आपले अन्नपदार्थ देखील खराब होतात.

आपण कोणतीही वस्तू फ्रिजमध्ये का ठेवतो, तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही एखादा खाद्यपदार्थ जर फ्रिजमध्ये न ठेवता तो उघड्यावर ठेवला तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियांची वाढ झपाट्याने होते, आणि तो अन्नपदार्थ खाण्यायोग्य राहत नाही. खराब होतो. दमट वातावरण हे बॅक्टेरियांच्या वाढीसाठी पोषक असतं, त्यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात, परंतु अती थंड वातावरणात अन्नपदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होऊ शकत नाही, त्यामुळे अन्नपदार्थ अनेक दिवस ताजे राहतात, त्यामुळे लोक अन्नपदार्थ फिजमध्ये ठेवतात. परंतु अनेकदा असं देखील होतं की, लाईट गेल्यामुळे फ्रिजचं टेंपरेचर वाढतं, त्यामुळे देखील अन्नपदार्थ खराब होऊ शकतात. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येऊयात, फ्रिजमध्ये आजकाल लोक बर्फाच्या ग्लासमध्ये दहा रुपयांचं नाणं का ठेवतात?

ही एक सोपी ट्रीक आहे, एक पाण्याने भरलेला ग्लास घ्या, त्याचा बर्फ होण्यासाठी तो फ्रिजमध्ये ठेवून द्या, जेव्हा ग्लास पूर्णपणे बर्फाने भरला जाईल, तेव्हा त्या बर्फाने भरलेल्या ग्लासवर एक दहा रुपयाचं नाणं ठेवा. आता तुम्ही जेव्हा कुठेही बाहेर जाल तेव्हा जर अचानक तुमच्या फ्रिजची लाईट गेली तर त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते, त्यावरून तुम्ही हे देखील ठरवू शकता की, तुम्ही जे फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ आहेत, ते खाण्यायोग्य राहिले आहेत की नाही? समजा ते दहा रुपयाचं नाणं हे बर्फावर सर्वात वरच असेल तर समजून जा तुमच्या फ्रिजचं तापमान थोडं देखील कमी झालं नव्हतं, आणि तुमच्या फ्रिजमधील सर्व पदार्थ हे खाण्यायोग्य आहेत.

मात्र जर ते दहा रुपयांचं नाणं हे त्या ग्लासाच्या मध्यभागी असेल तर समजून जा की वीज गेल्यामुळे तुमचं फ्रिज हे काही काळ बंद होतं, अशावेळी तुम्ही फ्रिजमध्ये जे अन्नपदार्थ ठेवले आहेत, ते खाण्यायोग्य आहेत की नाही? हे नीट काळजीपूर्वक तपासूनच मग खा. परंतु जेव्हा दहा रुपयांचं नाणं हे पूर्णपणे ग्लासच्या तळाशी असेल तर अशावेळी फ्रिजमधील जे लवकर खराब होतात, असे अन्नपदार्थ खाण्याची रिस्क घेऊ नका. सध्या ही ट्रिक प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, अनेकजण हा प्रयोग करताना दिसून येत आहेत.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं