नेत्यांची संपत्ती, देशातल्या सर्वात 10 श्रीमंत खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार, या मुख्यमंत्र्यांचे घर 35 कोटींचे

top 10 richest member of parliament in india: देशातल्या सर्वात 10 श्रीमंत खासदारांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचाही श्रीमंत खासदाराच्या यादीत समावेश आहे. त्यांच्याकडे भाजप 278 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

नेत्यांची संपत्ती, देशातल्या सर्वात 10 श्रीमंत खासदारांमध्ये महाराष्ट्रातील खासदार, या मुख्यमंत्र्यांचे घर 35 कोटींचे
bjp and congress
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 9:43 AM

राजकीय नेत्यांची संपत्ती चर्चेचा विषय असतो. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सर्वात दहा श्रीमंत खासदारांची यादी आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील खासदार आहे. सर्वाधिक संपत्ती भारतीय जनता पक्षाचे आंध्र प्रदेशातील खासदार डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे 5 हजार 700 कोटींची संपत्ती आहे. तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या संपत्तीची माहिती माध्यमांमध्ये आली आहे. त्यांच्याकडे 35 कोटींचे घर असून 931 कोटींची संपत्ती आहे.

महाराष्ट्रात श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती

देशातल्या सर्वात 10 श्रीमंत खासदारांमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 342 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचाही श्रीमंत खासदाराच्या यादीत समावेश आहे. त्यांच्याकडे भाजप 278 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हे सुद्धा वाचा
  1. डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी, आंध्र प्रदेश गुंटूर पक्ष TDP संपत्ती 5 हजार 700 कोटी
  2. कोंडा विश्वेश्वर रेड्डी – तेलंगणा, चेलेव्वा , भाजप , संपत्ती 4568 कोटी
  3. नवीन जिंदल – हरियाणा कुरुक्षेत्र भाजप १२४१ कोटी
  4. प्रभाकर रे – आंध्रप्रदेश नेल्लोर, TDP , 716 कोटी
  5. सीएम रमेश – आंध्र प्रदेश अनकापल्ली, TDP 497 कोटी
  6. ज्योतीरादित्य सिंधिया – मध्य प्रदेश गुना , भाजप 424 कोटी
  7. श्रीमंत शाहू छत्रपती – महाराष्ट्र कोल्हापूर , काँग्रेस , 342 कोटी
  8. श्रीभरत मुथूकुमिली , आंध्र ,विशाखापटनम , TDP 298 कोटी
  9. हेमा मालिनी – उत्तर प्रदेश मथुरा , भाजप 278 कोटी
  10. डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन कर्नाटक दावनगिरी, काँग्रेस, 231 कोटीड्डी

चंद्रबाबू नायडू यांच्याकडे 931 कोटींची संपत्ती

आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी शपथ घेतली. निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 931 कोटींची संपत्ती आहे. ते 35 कोटींच्या घरात राहतात. त्यांच्यावर 10.38 कोटी रुपये कर्ज आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांची संपत्ती मागील पाच वर्षांत वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत 39 टक्के वाढ झाली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या संपत्तीचा एक मोठा भाग त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांनी घेतलेल्या शेअरचा आहे. त्या हेरिटेज फूड्स कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर आहे. त्यांच्याकडे या कंपनीचे 2,26,11,525 कोटी शेअर आहेत. त्याची किंमत 763 कोटी रुपये आहे. तसेच इतर कंपन्यांचे शेअर त्यांच्याकडे आहे.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.