LPG Shortage : भारत स्वत: किती टक्के LPG गॅस बनवतो? कुठल्या देशांकडून सर्वाधिक गॅसची आयात होते?

LPG Shortage : अमेरिका-इराण युद्धादरम्यान LPG गॅसच्या कमतरतेने अडचणी वाढवल्या आहेत. सर्वात जास्त परिणाम हॉटेल्सवर झाला आहे. देशातील अनेक शहरात लांबलचक रांगा दिसत आहेत. युद्धामुळे देशात LPG गॅसचा पुरवठा थांबणार नाही असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय तेल कंपन्यांना उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे.

LPG Shortage : भारत स्वत: किती टक्के LPG गॅस बनवतो? कुठल्या देशांकडून सर्वाधिक गॅसची आयात होते?
gas lpg
| Updated on: Mar 10, 2026 | 4:55 PM

LPG गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध आता घराघरात चर्चेचा विषय बनलं आहे. बंगळुरु, चेन्नई आणि मुंबईतील हॉटेल-रेस्टॉरंट उद्योगाला मिडल ईस्टमधील युद्धाची झळ जाणवू लागली आहे. हॉटेल उद्योगासाठी लागणारा गॅस सिलिंडरचा पुरवठा बाधित झाल्याचं हॉटेल व्यावसायिकांचं म्हणणं आहे. युद्धामुळे देशातील किचनमध्ये गॅस पुरवठा थांबणार नाही. भारतीय कंपन्यांना गॅस उत्पादन वाढवण्यास सांगण्यात आलं आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु आहे. इराणने होर्मुज स्ट्रेटमधून होणाऱ्या तेल वाहतुकीला लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. युद्धामुळे एलपीजी संकट निर्माण होण्याची भिती आहे. सिलिंडरची किंमत 60 रुपये आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115 रुपयापर्यंत वाढली आहे. आता प्रश्न हा आहे की, भारताला एलपीजी कुठून मिळतो? आणि कसा बनतो?.

भारतात घरगुती गॅस दोन मार्गांनी उपलब्ध होतो. एक याचं भारतात उत्पादन होतं आणि दुसरं आयात करुन. भारतात जवळपास 60 टक्के LPG दुसऱ्या देशातून आयात होतो. आयात होणारा 90 टक्के घरगुती गॅस स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतो. भारत सर्वाधिक घरगुती गॅस आखाती देशांमधून विकत घेतो. खासकरुन सौदी अरेबिया, कतर आणि संयुक्त अरब अमिराती.

भारत स्वत: किती टक्क गॅस बनवतो?

एकूण आयातीच्या 60 ते 70 टक्के घरगुती गॅस याच देशांमधून येतो. त्याशिवाय अमेरिका, अल्जीरिया आणि नायजेरियामधून आयात होतो. म्हणूनच गॅस आयातीच्या बाबतीत भारतात मिडल ईस्ट देशांवर अवलंबून आहे. आयाती शिवाय भारत स्वत: सुद्धा गॅस निर्मिती करतो. देशात LPG (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) प्रामुख्याने क्रूड ऑइल रिफायनरी आणि नेचुरल गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये बनतो. भारत आपल्या गरजेच्या एकूण 40-45 टक्के गॅस स्वत: बनवतो.

भारतात कुठल्या-कुठल्या कंपन्या LPG गॅस बनवतात?

देशात एलपीजी निर्माणाच्या सरकारी आणि प्रायवेट दोन्ही सेक्टरमधल्या कंपन्या आहेत. सरकारी कंपन्यांमध्ये इंडियल ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL), ऑइल एंड नेचुरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) आणि ऑइल इंडिया लिमिटेड या कंपन्या आहेत. त्या शिवाय प्रायवेट सेक्टरमधल्या काही कंपन्या सुद्धा LPG बनवतात. यात रिलायन्स इंडस्ट्रीजची जामनगर रिफायनरी आणि न्यारा एनर्जीची वाडिनार (गुजरात) रिफायनरी यांचा समावेश आहे.

 

Follow Us