AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीने बँकेबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या, ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर होती पत्नी

लखनऊच्या गोमतीनगरमध्ये इसमाने ICICI बँकेबाहेर दिवसाढवळ्या पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडून हत्या केली. या हत्याकांडानांतर महिलेच्या पती ने स्वतःवरही गोळी झाडून घेतल्याचे वृत्त आहे. नेमकं काय घडलं तिथे ?

पतीने बँकेबाहेर पत्नी आणि बहिणीवर गोळ्या झाडल्या, ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर होती पत्नी
दुहेरी हत्याकांडाने हादरलं लखनऊ
| Updated on: Aug 20, 2026 | 10:17 PM
Share

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील गोमतीनगर हा पॉश परिसर गुरूवारी भीषण हत्याकांडाने हादरला. तिथे एका इसमाने आधी त्याची पत्नी आणि बहीण यांच्यावर दिवसाढवळ्या , सर्वांसमक्ष गोळ्या झाडल्या, त्यामध्ये दोघींचाही मृत्यू झाला. त्या दोघींवर गोळीबार केल्यानंतर आरोपीने स्वत:लाही गोळी मारून घेतली, तो गंभीरररित्या जखमी झाला. या गोळीबारामुळे संपूर्ण भागात प्रचंड खळबळ माजली असून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दिव्या मिश्रा असं मृत महिलेचं नाव असून ती ICICI बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत होती. दिव्या ही आरोपीची पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्या दुसऱ्या महिलेचं नाव सीमा वाजपेयी असून ती आरोपी मानस याची बहीण होती, अशी माहिती समोर आली आहे. गोळीबाराची ही धक्कादायक घटना बँकेच्या अगदी बाहेर घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

नेमकं काय झालं ?

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दोन्ही महिलांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळ्या लागल्यानंतर दोघीही गंभीर जखमी होऊन कोसळल्या. काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच गोंधळ उडाला. तर गोळीबार करणारा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेची घटनेची माहिती मिळताच गोमतीनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले.  पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, हत्येमागील कारणांचा तपास केला जात आहे.

CCTVचं फुटेज तपासण्यास सुरूवात

पोलिसांच्या प्राथमिक तपासात पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद, हे या हत्याकांडामागील संभाव्य कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीसांकडून या परिसरातील CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरूवात झाली आहे. आरोपी बँकेबाहेर कधी आणि कसा आला, तसेच गोळीबार नेमका कशा प्रकारे झाला, याचा तपास CCTVच्या माध्यमातून केला जात आहे.

गोळीबाराची ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी कोण-कोण उपस्थित होतं आणि कोणी हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला होता का, याचाही पोलीसांकडून तपास केला जात आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर गोमतीनगर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात