जमीन खोदताना अचानक आला आवाज, कंगाल झाले करोडपती, या मातीत खरंच उगतात हिरे मोती?

Diamond And Pearls Mine: कोणाचे आयुष्य, नशीब कधी आणि केव्हा बदलले हे सांगता येत नाही. अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या कफल्लक जीवन जगणाऱ्यांना कोट्यवधीची लॉटरी लागली आहे. या भूमीत खरंच हिरे मोती उगतात का?

जमीन खोदताना अचानक आला आवाज, कंगाल झाले करोडपती, या मातीत खरंच उगतात हिरे मोती?
जमीन खोदताना अचानक आला आवाज, कंगाल झाले करोडपती, या मातीत खरंच उगतात हिरे मोती?
| Updated on: Nov 22, 2026 | 1:38 PM

Diamond And Pearls Mine: एखाद्याचे नशीब केव्हा बदलेल याचा काही भरवसा नसतो. अनेकदा मजूरी करणारे, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्यांना लॉटरी लागते आणि आपण दैवावर भाळतो. असाच काहीसा प्रकार सध्या मध्य प्रदेशमध्ये समोर आला आहे. एक, दोन नाही तर पाच जणांचे आयुष्यच नाही तर नशीब बदलले आहे. कंगाल लोक धनी झाले आहेत. ते लखपती, करोडपती झाले आहेत. या मातीत खरंच हिरे मोती पिकतात का?

ऑटो चालकाचे नशीब फळफळलेः २० नोव्हेंबर २०२६ रोजी पन्ना येथील ऑटो चालक सोनू रैकवार यांचे नशीब फळफळले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून हिरा सापडल्याचे आणि लखपती झाल्याचे स्वप्न वारंवार पडत होते. त्यांनी ही बाबा कुटुंबियांना सांगितली. त्यांनी हिरा कार्यालयात जाऊन परवाना काढला आणि राणीपूर परिसरात पहिल्यांदाच खाणीत खोदकाम सुरू केले. १५ दिवसांत त्यांचे नशीब चमकले. खाणीतून ३.१७ कॅरेटचा जेम क्वालिटी हिरा सापडला. त्याची अंदाजित किंमत ११ ते १५ लाख रुपये इतकी आहे.

Loading...

शेतकऱ्याला मिळाला ३२.८० कॅरेटचा हिराः मध्य प्रदेशातील पन्ना येथील शेतकरी स्वामीदीन पाल यांचे नशीब असेच फळफळले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी पन्ना येथे खोदकामाचा परवाना घेतला. सरकोहा परिसरात भाडे तत्वावर घेतलेल्या खाणीत त्यांना ३२ कॅरेट ८० सेंटचा जेम्स क्वालिटी हिरा सापडला होता. त्याची अंदाजे किंमत एक कोटी रुपये इतकी होती.

राजू गोंड यांना लॉटरीः तर कृष्णा कल्याणपूर येथील पटी उथळ हिरा खाणीत राजू गोंडू यांना १९ कॅरेट २२ सेंटचा मौल्यवान हिरा सापडला. राजू गोंड हे मोलमजूरी करत तर कधी ट्रॅक्टर चालवत. अनेकांच्या प्रेरणादायी कथा कानावर आल्यावर त्यांनीही परवाना काढला आणि खोदकाम केले. त्यांच्या हिऱ्याची अंदाजित किंमत ८० लाख ते १ कोटी रुपयांदरम्यान आहे.

रचना गोलदार यांना एकाच आठवड्यात ८ हिरेः सगळ्यात जबरदस्त कहाणी रचना गोलदार यांची आहे. त्या मोलमजूरी करत. त्यांनी खाणीचा पट्टा मिळवला होता. त्यांचे नशीब इतके जोरावर होते की, एकाच आठवड्यात त्यांना ८ हिरे मिळाले. या ८ हिऱ्यांचे एकूण वजन २.५३ कॅरेट होते. त्यातील सहा हिरे उच्च दर्जाचे होते. हे हिरे लिलावासाठी ठेवण्यात आले आहे. यातून त्यांना कोट्यवधी रुपये मिळण्याची खात्री आहे.

मोतीलाल यांना मिळाला १.५ कोटींचा हिराः तर ५० वर्षे मोलमजुरी करून आयुष्य खर्ची पडलेले मोतीलाल यांचे नशीब अचानक फळफळले होते. मोतीलाल प्रजापती यांना एकाच आठवड्यात जॅकपॉट लागला होता. त्यांना १.५ कोटींचा हिरा हाती लागला होता. त्यांनी कृष्णा कल्याणपूर पट्टी गावाजवळ एक छोटा भूखंड भाडेपट्ट्यावर घेत खोदकाम केले होते. रात्रीतूनच ते कोट्याधीश झाले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us