माफिया अतिक अहमदला भारतररत्न द्या म्हणणाऱ्या काँग्रेस उमेदवाराची पक्षातून हक्कालपट्टी
माफिया अतिक अहमदच्या हत्येनंतर काही जण त्याच्या समर्थनात पुढे आले आहेत. माफियाला काही जण शहीद संबोधित करत आहे. बीडमध्ये देखील असाच प्रकार पाहायला मिळाला.

मुंबई : माफिया अतिक अहमद ( Ateeq Ahamad ) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रत्येकजण या मुद्द्यावर आपापल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. आता सोशल मीडियावर काँग्रेस नेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो माफिया अतिक अहमदला भारतरत्न देण्याची मागणी करताना दिसत आहे. या वक्तव्याने त्यांच्या अडचणी वाढवल्याच शिवाय पक्षाकडूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
राजकुमार सिंह उर्फ रज्जू भैया प्रयागराजमधून महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून ( Congress Candidate ) निवडणूक लढवत होते. पण एका वादग्रस्त विधानामुळे त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल ( Viral Video) होत आहे, ज्यामध्ये त्यांनी अतिक अहमद हा शहीद झाला असून त्याला भारतरत्न देण्याची मागणीही केली होती. यासोबतच योगी सरकारवर ( Yogi Government ) हत्येचा आरोप करण्यात आला होता.
सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी
काँग्रेस पक्षाने ( Congress Party ) त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करून उमेदवारीही मागे घेतली आहे. रज्जू यांचे ते वक्तव्य वैयक्तिक आहे, पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने रज्जू यांची महापालिका निवडणुकीसाठी दिलेली उमेदवारी मागे घेतली आहे.
उमेश पाल हत्येप्रकरणी ( Umesh Pal Murder Case ) पोलीस कोठडीत असलेल्या माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची १५ एप्रिलच्या रात्री केल्विन हॉस्पिटलबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. तर अतिक अहमदचा मुलाचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला होता. अतिकची पत्नी देखील फरार असून तिचा देखील शोध घेतला जात आहे.
बीडमध्ये अतिकच्या समर्थनाथ पोस्टर
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार अतिक अहमद आणि त्याचा धाकटा भाऊ अश्रफ यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात बॅनर लावण्यात आले आहेत. बीड ( Beed ) शहरात लावण्यात आलेल्या या पोस्टर्समध्ये दोन्ही माफिया बंधूंना शहीद संबोधण्यात आले आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र पोलिसांनी बीडमधील माजलगाव चौकातून हे पोस्टर तातडीने हटवले आहे.
पोस्टर्स लावणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक ही केली आहे. या सर्वांना कलम 293, 294 आणि 153 अंतर्गत म्हणजेच दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
