
मध्यप्रदेशातील पवित्र जबलपुरमध्ये भव्य जीवन उत्कर्ष महोत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव 3 ते 7 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. याच पवित्र भूमीत 13 सप्टेंबर 1933 रोजी परमपूज्य महंत स्वामी महाराजांचा जन्म झाला. नंतर ते जगभरातील BAPS स्वामीनारायण संस्थेचे आध्यात्मिक प्रमुख आणि लाखो हृदयांसाठी प्रेरणास्त्रोत बनले. त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये “संप्रदायों गुरु क्रमः” असा उल्लेख आहे. याचाच अर्थ खरा संप्रदाय हा त्याच्या गुरु परंपरेने ओळखला जातो. भगवान श्री स्वामीनारायणांपासून सुरू झालेली ही परंपरा सहाव्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, प्रकट ब्रह्मस्वरूप, परमपूज्य महंत स्वामी महाराजांपर्यंत अखंडपणे चालू आहे. त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती जाणून घेऊयात.
महंत स्वामी महाराजांचे पूर्वीचे नाव विनुभाई होते. लहानपणापासूनच त्यांच्यात शांती आणि ज्ञानाची तहान पहायला मिळत होती.
विनुभाईंना वाचनाची आवड होती, त्यांचे पुस्तकांवर प्रचंड प्रेम होते. ते बहुतेकदा जवळच्या बागेत किंवा चांदण्या रात्रीही अभ्यास करायचे. त्याची एकाग्रता खूप अद्भुत होती, वर्गात ऐकलेले धडे ते कधीही विसरत नव्हते, त्यामुळे घरी आल्यानंत त्यांना अभ्यास करण्याची गरज नसायची.
शाळेत जाताना एक मोठा नाला पार करावा लागत होते. इतर मुलांचे पॉलक मुलांसोबत तिथे यायचे, मात्र निर्भय विनुभाई एकटेच तो नाला पार करायचे. लहानपणापासूनच त्याच्यात आत्मविश्वास आणि निर्भयता होती.
घरी गुजराती, बाहेर हिंदी आणि शाळेत इंग्रजी अशा तीन भाषांचे वातावरण होते. मात्र त्यांची प्रत्येक विषयाची अद्भुत पकड होती. त्यांना अजूनही तिसरीत असताना पाठ केलेल्या कविता आठवतात. त्याची आवडती ओळ होती, ‘He that is down need fear no fall, he that is humble ever shall have God to be his guide’.
महंत स्वामी महाराजांनी जबलपूरमधील क्राइस्ट चर्च बॉईज हायस्कूलमधून सिनियर केंब्रिजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पाचवीला प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर त्यांनी बक्षीस म्हणून एक पुस्तक निवडले होते.
महंत स्वामींची कलात्मक बुद्धिमत्ता खूप अद्वितीय होती. त्यांना सुंदर चित्रे काढण्याची आवड होती. ते म्हणायचे, “मी चित्र काढतो, पण चित्रकलेत करिअर करण्याचा मी कधीच विचार केला नव्हता.” एखादे चित्र काढल्यानंतर ते विसरून जायचे. कारण कारण खरी कला ही आसक्ती नसून आत्म-समाधानाचे साधन आहे असा त्यांचा विचार होता.
फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ होता. ते लेफ्ट फुल-बॅक पोझिशनवर प्रभावी खेळ करायचे. ते नेहमीच शांत आणि हसरे होते, त्यांच्या सर्व वर्गमित्रांचे ते आवडते होते.
महंत स्वामांच्या शाळेचे मुख्याध्यापक रॉबिन्सन अनेकदा म्हणायचे की, “विनुभाई, तुम्ही भविष्यात एक महान धार्मिक नेते व्हाल,” ही भविष्यवाणी आज खरी ठरली आहे.
महंत स्वामी महाराजांचे जीवन आपल्याला हे सांगते की, अध्यात्म हे जन्मापासून मिळत नाही, तर स्वभावाने येते. ज्ञान, नम्रता, निर्भयता आणि सेवा हे चार गुण बालपणापासूनच त्यांच्या अस्तित्वाचा एक भाग होते.
आज तोच मुलगा ज्याचे बालपण पुस्तके आणि प्रार्थनेत रमले होते, तो 55 देशांचा, 1800 मंदिरांचा आणि जगभरातील लाखो भक्तांचा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की “खरा विद्यार्थी तोच असतो जो आयुष्यभर ज्ञान, नम्रता आणि सेवेत मग्न राहतो.”