विधान परिषदेवर निवडून गेलेल्या सदस्यांना किती पगार मिळतो, कोणत्या राज्यात दिले जाते सर्वाधिक मानधन? जाणून घ्या
राज्यामध्ये विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. देशातील इतरही राज्यांमध्ये ही निवडणूक पार पडली. जाणून घेऊयात, की निवडून आलेल्या या सदस्यांना नेमका किती पगार मिळतो?

महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये विधानपरिषदेच्या २८ जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. या सर्व जागांसाठीची मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झाली आहे. या जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं होतं. महाराष्ट्रातील ५, उत्तर प्रदेशातील११, बिहारमधील ८ आणि कर्नाटकमधील ४ जागांच्या या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील १९ जागांवरील लढत चांगलीच चुरशीची झालेली पाहायला मिळाली आहे.बिहारमध्ये तब्बल १५० उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. त्यापैकी ९० पदवीधर आणि ६० शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, या निवडणुकांदरम्यान एक प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होतो की, विधान परिषद सदस्य एमएलसी कोण असतो? त्यांना आमदारांएवढाच पगार दिला जातो का? निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना शासकीय निवास, वाहन आणि प्रवास तथा वैद्यकीय सेवांसारखे कोणते लाभ दिले जातात?
एमएलसी म्हणजे विधान परिषद भारतातील काही राज्यांमध्येच द्विसदनीय कायदेमंडळ आहे. विधानसभेच्या सदस्याला आमदार म्हणतात तर विधान परिषदेच्या सदस्याला एमएलसी म्हणतात. हे दोघेही राज्याच्या कायदा निर्मिती प्रक्रियेत सहभागी होतात. दरम्यान, संपूर्ण भारतामध्ये एमएलसी सदस्यांचे वेतन हे एकसमान नसते. ते त्या त्या राज्य सरकारच्या नियमांनुसार निर्धारित केले जाते.
दरम्यान, उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील विधान परिषद सदस्यांचे एकूण वेतन सर्वाधिक असून मासिक अंदाजित उत्पन्न हे २.५ लाख ते २.९६ लाख रुपयांपर्यंत आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक मासिक वेतन दिले जाते. तिथे मासिक वेतन २.६६ त् २.९६ लाख दिले जाते.
उत्तर प्रदेशामध्ये मूळ मासिक पगार ३५ हजार रुपये आहे. मतदारसंघ भत्ता आणि वैद्यकीय भत्ता यांसारखे अतिरिक्त भत्ते जोडून ही रक्कम २.९६ लाखांपर्यंत जाते. तर महाराष्ट्रातील एमएलसींच्या वेतनाबद्दल सांगायचं झाल्यास मासिक वेत अंदाजे २.५२ लाख रुपये आहे. तेलंगणातील विधानसभा सदस्यांनाही चांगले वेतन मिळते. तेथिल सदस्य हे २.५० लाख रुपये प्रतिमहिना कमावतात.