कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय..

सीजेपीने दिल्लीत मोठे आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यांचे हे आंदोलन दिल्ली पोलिसांनी मोडीत काढले. त्यातच आता सीजेपीने मोठी घोषणा केली. सीजेपीकडून आपल्या पक्षाची ताकद वाढवली जात आहे.

कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय..
CJP
| Updated on: Nov 15, 2026 | 8:24 AM

कॉकरोच जनता पार्टीने पहिल्या आंदोलनात सरकारला मोठा दणका दिला. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात त्यांना यश आले. मात्र, त्यांचे दुसरे आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी होते, पण या आंदोलनात त्यांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या बड्या नेत्यांकडून बॉन्डवर सह्या करून घेतल्या. हेच नाही तर साैरभ दास आणि आशुतोष रांका यांना बॉन्डवरील नियम तोडल्याने त्यांना थेट जेलमध्येही राहावे लागले. त्यातच आता कॉकरोच जनता पार्टीने अत्यंत मोठा निर्णय घेतला. सीजेपीने आपल्या 10 राज्यातील प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा केली. सीजेपीचा उद्देश आहे की, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आपल्या पक्षाची ताकद वाढावी, याकरिता सीजेपीने ही मोठी घोषणा केली. कॉकरोच जनता पार्टीने संघटनात्मक विस्तारासाठी क्षितीज पगार यांची नियुक्ती केली.

राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातील प्रभारीच्या नावाची घोषणा केली. महाराष्ट्रामध्ये 15 सदस्य, उत्तर प्रदेशात 16 सदस्य, झारखंडमध्ये 14 सदस्य, बिहारमध्ये 13 सदस्य, पश्चिम बंगालमध्ये 12, राजस्थानमध्ये 5, जम्मू काश्मीरमध्ये 4 सदस्य आणि उत्तराखंडमध्ये 6 सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Loading...

हे लोक जास्तीत जास्त लोकांना आपल्यासोबत जोडण्याचे काम करतील. सीजेपीने 36 दिवस जंतर मंतरवर आंदोलन पुकारले. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. त्यांच्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले. त्यानंतर मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीने आंदोलन पुकारले. मात्र, त्यांच्या या आंदोलनाला यश मिळाले नाही.

जेनझींना मोठ्या संख्येने त्यांनी दिल्ली बोलावले होते. मात्र, त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले नाही. त्यात सीजेपी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजपावर गंभीर आरोप करताना सीजेपी दिसली. त्यातच कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य नेते अभिजीत दिपके यांनी दिल्लीत ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचे काही फोटोही पुढे आली. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सीजेपी प्रयत्न करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us