AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा; देशात खळबळ!

जंतर मंतरवर आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागेल, असे सीजेपीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. या घोषणेमुळे आता सत्ताधारी कात्रीत सापडले आहेत.

CJP Protest : आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा; देशात खळबळ!
cjp protests and abhijeet dipkeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 6:12 PM
Share

CJP Protest : कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीचे दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलन संपलेले आहे. हे आंदोलन संपलेले असले तरीही सीजेपीची चर्चा मात्र अजूनही सुरूच आहे. आंदोलन मागे घेताना सरकार कोणत्याही आंदोलकाविरोधात गुन्हा दाखल करणार नाही, कोणावरही पोलीस कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु आश्वासन मिळालेले असले तरीही देशभरात अनेक ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप सीजेपीने केला आहे. या कारवाईबाबत माहिती मिळताच आता सीजेपीने पुन्हा दंड थोपटले आहेत. सीजेपीने सरकारला थेट इशारा दिला आहे.

नेमकी काय घोषणा केली?

देशात वेगवेगळ्या ठिकाणी सीजेपीच्या आंदोलकांवर कारवाई केली जात आहे. हाच मुद्दा देशासमोर मांडण्यासाठी तसेच सीजेपीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सीजेपीने पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने सीजेपीच्या आंदोलनात ज्यांनी-ज्यांनी सहभाग नोंदवला, त्यांच्यावर कारवाई करू नये. तसेच कुठेही गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत, अशी मागणी केली. सरकारने दिलेली आश्वासने पाळावीत, असेही आवाहन रांका यांनी केले.

तर आम्ही जंतर-मंतरवर आंदोलन करणार

तसेच पुढे बोलताना सरकार जर या केसेस मागे घेण्यास तयार नसेल तर आम्ही पुन्हा एकदा जंतर मंतरवर आंदोलन करू, असा थेट इशाराही रांका यांनी सरकारला दिला आहे. दरम्यान, सीजेपीने आपल्या पत्रकार परिषदेत देशात कोणकोणत्या ठिकाणी आंदोलकांवर कारवाई केली जात आहे, याबाबतही सविस्तर सांगितलं. यावेळी ज्येष्ट वकील कपिल सिब्बल यांनीही मी सीजेपीला कायदेशीर मदत पुरवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच माझी भूमिका ही फक्त कायदेशीर मदतीपुरतीच सीमित आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. यासह देशभरातील वकिलांनी सीजेपीच्या मदतीला पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिल्लीत फेस डिटेक्शनच्या माध्यमातून कारवाई केली जात असल्याचे मला समजले आहे. ही कारवाई थांबवावी, असे आवाहन सिब्बल यांनी केले आहे. दरम्यान, सीजेपीच्या इशाऱ्यानंतर आता केंद्र सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण...
अनिल अंबानी समूहाला मोठा दणका! 510 कोटींची मालमत्ता जप्त, मोठं कारण समोर
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवारांवरच केला आरोप!
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध नाही, केवळ...
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?