मोठी बातमी! राजधानी एक्सप्रेसला आग, गार्डचे करावे तेवढे काैतुक कमीच, तब्बल 68 प्रवासी..
नुकताच आज सकाळी 5.20 ला एक धक्कादायक घटना घडली. तिरुवनंतपुरम-निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (12431) मध्ये आग लागली. बी-1 या कोचला आग लागली. काही वेळातच सर्वकाही जळून खाक झाले. गार्डच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळलीये.

आज सकाळी मध्य प्रदेशातील रतलाम येथे तिरुवनंतपुरम-निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (12431) मध्ये आग लागली. या घटनेने एकच खळबळ उडाली. तिरुवनंतपुरम-निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेसच्या B-1 डब्ब्याला ही आग लागली. गार्डच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. ही ट्रेन तिरुवनंतपुरमहून नवी दिल्लीकडे जात होती. यादरम्यान अचानक बी-1 ला मोठी आग लागली. सुदैवाने आगीवर वेळेवर नियंत्रण मिळवण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही मिनिटांमध्ये आगीचा भडका उडाला. पाहता पाहता संपूर्ण कोचपर्यंत आग पोहोचली. ही आग नक्की कशी लागली, याबाबत कोणतीही माहिती पुढे येऊ शकली नाही. मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाली 5.20 ला कोटा नियंत्रण कक्षातून रतलाम नियंत्रण कक्षाला तिरुवनंतपुरम-निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस गाडी क्रमांक 12431 च्या बी-1 कोचला आग लागल्याचा फोन आला.
रेल्वे आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तात्काळ प्रतिसाद देत वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. तो डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने सर्व प्रवाशांना वेळेवर बाहेर काढण्यात आले. सर्वात अगोदर रेल्वे गार्डला बी-1 डब्यातून धुर निघताना दिसला. त्याने ही माहिती तात्काळ लोको पायलटला दिली. लोको पायलटने सर्वात अगोदर गाडी थांबवली आणि नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली.
यादरम्यान सीआरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोर्चा सांभाळत कोचमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी ज्या डब्याला आग लागली तो डबा वेगळा केला. त्यामुळे ही आग इतर डब्ब्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. ज्या कोचला आग लागली त्या कोचमध्ये एकून 68 प्रवासी होते. सर्वांनी सुरक्षित उतरवण्यात आले.
ही घटना कोटा विभागातील लुनिरीच्छा आणि विक्रमगड आलोट स्थानकांदरम्यान घडली. रतलामचे डीआरएम घटनास्थळी रवाना झाले आहेत. एआरटी/एआरएमई गाडी रतलामहून निघाली आहे. रतलामहून घटनास्थळी एक टॉवर वॅगन पाठवण्यात आली आहे. आगीमुळे काही गाड्यांच्या वाहतुकीत व्यत्यय आला आहे. रेल्वे प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अपलाइन रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. या आगीच्या घटनेचे काही व्हिडीओ देखील पुढे आलीत.