AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मुलाच्या आंदोलनाचा मोठा विजय,अभिजीतच्या आईची पहिली प्रतिक्रीया आली…

अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीची मोठी मागणी पूर्ण झाली आहे. धर्मेंद्र प्रधान अखेर राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे कॉक्रोज जनता पार्टीला मोठे यश आले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मुलाच्या आंदोलनाचा मोठा विजय,अभिजीतच्या आईची पहिली प्रतिक्रीया आली...
abhijeet dipke mother
| Updated on: Jul 25, 2026 | 5:18 PM
Share

कॉक्रोज जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. अभिजीत दीपके यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. आता केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला आहे. जंतरमंतर येथे त्यामुळे एकच जल्लोष सुरु झाला आहे. आता मुलाच्या या आंदोलनाला मिळालेल्या यशावर अभिजीत दीपके यांच्या आईची पहिली प्रतिक्रीया आली आहे.

रात्रभर आम्हाला झोपा येत नव्हत्या, रात्री तीन वाजेपर्यंत आम्ही जागे असायचो लेकराचं काय होतंय याची चिंता लागून राहिली होती. अडीच महिने त्याला झोप नाही काही, अखेर त्याच्या कष्ठाचे चीज झाले आहे अशी प्रतिक्रीया अभिजीत दीपके यांची आई अनिता दीपके यांनी दिली आहे.  6 जूनपासून ते ( अभिजीत दीपके ) बोस्टनहून आले आहेत, आता अडीच महिने झाले आहेत. त्यांना झोप नाही. आता त्याच्या कष्ठाचे चीज झाले आहे. आता बरं वाटतंय असे अनिता दीपके यांनी यावेळी टीव्ही नाईन चॅनलशी बोलताना सांगितले.

आज मला खूप मोठा आनंद झाला आहे, त्याच्या वयाच्या मानाने त्याने एवढे मोठे आंदोलन केले आहे.  तो आंदोलनात उतरला आणि सक्सेस झाला आहे.  आम्हाला तर भीती वाटत होती. मी त्याला म्हटलं बाळा होत नसेल तर ये परत. तो नाही म्हटला. दोन-तीन दिवस बघू दे काय होतं असेही अनिता दीपके यांनी सांगितले.

आम्ही त्याला कधी पाच बोटं लावली नव्हते

काल त्याचं माझ्याशी व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं होतं. आज खूप आनंद वाटत आहे.  शब्दातही सांगता येत नाही एवढा आनंद मला झाला आहे.  आज त्याला एवढे मोठे यश भेटलं.  त्याला चापट खावी लागली, त्याला चापट मारल्यानंतर आम्हाला खूप कसतरी झालं होते. आम्ही त्याला कधी पाच बोटं लावली नव्हते. त्याने जयपुरला जाऊन चापट खाली त्या दिवशी फार वाईट वाटलं होतं आज फार आनंद वाटायला लागला.  आता काही चिंता नाही राजीनामा झाला बेटा तू आता घरी ये, आम्ही तुझी वाट बघतोय असे अनिता दीपके म्हणाल्या.

येथे पोस्ट वाचा –

ही मुलं लगेच उठून जातील असं त्यांना वाटले असेल

हे देशव्यापी आंदोलन होते, यामध्ये कोणाचा विजय किंवा पराजय हा भाग नाही. या आंदोलनापासून आपल्या भारताच्या शिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल होणार आहे त्याची ही सुरवात आहे. सर्व शहरातून याला पाठिंबा भेटला म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. उलट धर्मेंद्र प्रधान यांच्या मनाचा मोठेपणा आहे त्यांच्यात कमीपणा वगैरे काही नाही. हा जय किंवा पराभवाचा प्रश्न नाही, हा विद्यार्थ्यांच्या भावनेचा प्रश्न होता. आज आंदोलनाला यश आले आहे. कदाचित ही मुलं दोन – तीन दिवस बसतील आणि उठून जातील असं त्यांना वाटले असेल. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या हे सोशल मीडियातून जास्त बाहेर पडले. त्यामुळे त्यांना आतंकवादी म्हटल्यामुळे ते जास्त दुखावले गेले असेही अभिजीत हीचे वडील भगवान दीपके यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.

धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले ?

सरकारला केली होती विनंती…

याआधी अभिजीतचे आंदोलनात लाठीमार झाला तेव्हा त्यांची आई अनिता दीपके यांनी चिंता व्यक्त केली होती. त्याला अटक झाली तर आंदोलन आंदोलन वेगळं वळण लागेल अशी प्रतिक्रीया तेव्हा अभिजीतची आई अनिता दीपके यांनी दिली होती. आम्हाला आता लाठीचार्जची भीती वाटते. आता आंदोलनाला ३५ ते ३६ दिवस झाल्याने सरकारने लवकरात लवकर मार्ग काढावा असे अभिजीतच्या आईने म्हटले होते.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच