AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेकअप-छोटे कपडे, लव्ह जिहाद, मुलीवरुन टोमणे, टेनिस प्लेअर राधिकाची हत्या नक्की का झाली ?

गुरुग्रामच्या टेनिस प्लेअर राधिकाच्या हत्ये प्रकरणात तिची मैत्रीण हिमांशिका हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.. त्यात तिने अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले आहे.

मेकअप-छोटे कपडे, लव्ह जिहाद, मुलीवरुन टोमणे, टेनिस प्लेअर राधिकाची हत्या नक्की का झाली ?
| Updated on: Jul 13, 2025 | 8:54 PM
Share

रियाणातील गुरुग्राम येथील प्रसिद्ध टेनिस खेळाडू आणि कोच राधिका यादव हिच्या हत्येचा गुंता वाढतच आहे. तिच्या वडिलांनीच तिची गोळी घालून हत्या केल्यानंतर देशभरात हे प्रकरण चर्चेत आहे. राधिका हिची मैत्रिण हिमांशिका ही तिच्या सोशल मीडिया हँडवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तिने राधिका तिच्या घरच्यांमुळे खूप त्रस्त होती असे म्हटले आहे. राधिकाच्या मैत्रीणीने या व्हिडीओत सांगितले की तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध टाकले होते. त्यामुळे ती खूपच नाराज होती. राधिकाच्या वडीलांचे मित्र तिले टोमणे मारायचे. हिमांशिका हीने दावा केला आहे के तिच्या वडीलांचे मित्र तिच्या यशामुळे जळायचे आणि सारखे तिला टोचून बोलायचे…

हिमांशिका हीने तिच्या दुसऱ्या व्हिडीओ अनेक गोष्टींवरील पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून राधिकाचे जीवन नर्कासारखे बनले होते. तिच्यावर घरचे लोक निरनिराळी बंधने टाकत होती.एका वेळेनंतर राधिका थकली आणि तिने माघार घेतली. तिच्या घरच्यांच्या सांगण्यानुसार वागू लागली. तरीही तिच्या वडिलांचा राग काही कमी झाला नाही.

वडीलांचे मित्र टोमणे मारायचे

हिमांशिका हीने आपल्या व्हिडीओत दावा केला आहे की राधिकाच्या वडील दीपक यादव यांचे मित्र तिच्या यशाने जळायचे आणि तिच्या वडीलांना टोमणे मारायचे.हिमांशिका हीने सांगितले की राधिकाच्या वडिलांचे मित्र त्यांना मुलगी मेकअप करायला लागली आहे, छोटे कपडे घालते,तिच्याकडून धंदा करुन घे, बेटीची कमाई खात आहेस का ? असे टोमणे मारत आहे.या टोमण्यांमुळे वडील नाराज होते आणि त्यांनी राधिकांवर अनेक निर्बंध लादायला सुरुवात केली.

3 दिवसांपासून सुरु होता मर्डरची प्लानिंग

राधिकाची मैत्रीण हिमांशिका हिने सांगितले की तिला जेव्हा बातम्यांतून कळाले राधिकाची हत्या झाली तेव्हा ती तिच्या अंत्यसंस्काराला गेली होती. तेव्हा तिला कळले की राधिका हिच्या हत्येचा  कट तीन दिवसांपासून रचला जात होता. तिचे वडील पिस्तुल घेऊन आले होते. जेव्हा राधिकाला गोळी घातली तेव्हा सर्वांना तेथून दूर ठेवण्यात आले. राधिकाच्या आईला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले. भावाला कामासाठी बाहेर पाठवले आणि तिचा पाळीव कूत्रा पिटबुल यालाही घटनास्थळापासून लांब ठेवले, म्हणजे तिला वाचवायला कोणी येऊ नये.

लव्ह जिहाद, रिल्स बनवणे भाकडकथा

हिमांशिका हीने सांगितले की लव्ह जिहाद आणि सोशल मीडियावर रिल्स बनवणे संपूर्ण भाकडकथा आहेत. काय ती खूपच समजदार मुलगी होती. राधिकाचे सोशल मीडियात अकाऊंटवर केवळ ६८ लोक होते. आणि तिने शेवटची पोस्ट १ वर्षांपूर्वी केली होती. तिने घरच्यांमुळे सोशल मीडीयावर सक्रीय रहाणे बंद केले होते.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.