AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, 20 खासदार NCPI मध्ये सामील होणार; NDA ला देणार पाठिंबा

TMC 20 MP : ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 20 बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.

ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, 20 खासदार NCPI मध्ये सामील होणार; NDA ला देणार पाठिंबा
TMC 20 MP Join NCPIImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 14, 2026 | 9:01 PM
Share

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. 20 बंडखोर खासदारांची आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यानंतर खासदार काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंद्योपाध्याय आणि शताब्दी रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. आता या खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्ष आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात सक्रिय आहे. हे खासदार या पक्षात सामील झाल्यानंतर ते NDA ला पाठिंबा देणार असल्याचेही समोर आले आहे.

एनडीएला पाठिंबा देणार

आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर काकोली घोष दस्तीदार यांनी सांगितले की, ‘टीएमसीमधून निवडून आलेलो आम्ही 20 खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटलो आणि स्वतंत्र गट म्हणून बसण्याची परवानगी मागणारे पत्र दिले. आमची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांशपेक्षा जास्त आहे. आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीन होत आहोत आणि पुढे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत देशासाठी काम करू.’

NCPI मध्ये विलय

बंडखोर खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी सांगितले की, ‘आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीन होणार आहोत. त्यासाठीचा अर्ज लोकसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. 20 जुलैपूर्वी आमच्या गटाला स्वतंत्र कार्यालय आणि मान्यता मिळेल. त्यानंतर खरी तृणमूल काँग्रेस कोणाची, याचा निर्णय न्यायालय घेईल.’ याआधी या खासदारांनी टीएमसीमधील स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा केला होता. मात्र आता त्यांनी स्वतंत्र गटाऐवजी NCPI मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे.

या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या बंडखोर खासदारांमध्ये काकोली घोष दस्तीदार, शताब्दी रॉय, सुदीप बनर्जी, सयानी घोष, माला रॉय, अरूप चक्रवर्ती, घाटलचे खासदार दीपक अधिकारी (देव), युसूफ पठाण, जून माल्या, प्रसून बनर्जी, शर्मिला सरकार, मिताली बाग, अबू ताहिर आणि खलिलुर रहमान यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या खासदारांसोबत भाजपचे निशिकांत दुबे देखील उपस्थित होते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी