सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींची जोडले हात, SIR च्या मुद्द्यावरून थेट मांडली भूमिका, म्हणाल्या आम्हाला न्याय…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सखोल मतदार यादी फेरतपासणीच्या प्रक्रियेला विरोध करत थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होईल.

सुप्रीम कोर्टात ममता बॅनर्जींची जोडले हात, SIR च्या मुद्द्यावरून थेट मांडली भूमिका, म्हणाल्या आम्हाला न्याय...
MAMATA BANERJEE AND SUPREME COURT
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 04, 2026 | 3:15 PM

SIR Hearing In Supreme Court : पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR च्या प्रक्रियेला विरोध केला जातोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज (4 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी बॅनर्जी यांनी स्वत: आपली बाजू मांडली. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही थेट निडवणूक आोयगाला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणावर 9 फेब्रवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय

सर्वोच्च न्यायालयात आज SIR ला विरोध करणाऱ्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी यादेखील न्यायालयात उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:देखील न्यायालयापुढे बाजू मांडली. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. मतदार याद्यांच्या फेरतपासणीला अनेक वर्ष लागतात. निवडणूक तोंडावर आलेली असताना SIR प्रक्रियेला घाईगडबडीत लागू केले जात आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.

आम्हाला न्याय हवाय, म्हणून इथे आलो- ममता बॅनर्जी

विशेष म्हणजे सुनावणी सुरू असताना त्यांनी निवडणूक आयोगाची व्हॉट्सअॅप आयोग म्हणत निर्भर्त्सना केली. निवडणूक आयोगाकूडन अनेक लोकांची नावे मतदार यादीतून हटवली जात आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी आलो आहोत. याआधी आमचे आक्षेप आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलेले आहेत. परंतु तिथे आमचे कोणीही ऐकत नाहीये, अशी खंतही ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे बोलून दाखवली.

निवडणूक आयोगाला नोटीस, नेमकं काय उत्तर देणार?

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या याचिकेनंतर आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोग येत्या सोमवारी आपले उत्तर निवडणूक आयोगापुढे सादर करणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यावर नेमकी कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.