आमदारांच्या घरावर हल्ला, इंटरनेट बंद, 2 जिल्ह्यात संचारबंदी, मणिपूरमध्ये पुन्हा आगडोंब

Manipur Curfew : मणिपूरमधील इंफाल पश्चिम जिल्ह्यातील सागोलबंद परिसरात प्रदर्शन करणाऱ्यांनी भाजपचे आमदार इमो यांच्या घरावर हल्ला केला. इमो हे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे जावई आहेत. त्यांनी सरकारकडे दंगेखोरांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

आमदारांच्या घरावर हल्ला, इंटरनेट बंद, 2 जिल्ह्यात संचारबंदी, मणिपूरमध्ये पुन्हा आगडोंब
मणिपूर हिंसाचार
| Updated on: Nov 17, 2024 | 9:24 AM

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. इंफाल पश्चिम आणि इंफाल पूर्व जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. तर इंफाल पश्चिम, इंफाल पूर्व, बिष्णुपूर, थौबल, काकचिंग, कांगपोकपी आणि चुराचांदपूर या सात जिल्ह्यात दोन दिवसांसाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सहा लोकांच्या हत्येनंतर या जिल्ह्यात विरोध सुरु झाला आहे. लोक रस्त्यावर आले आहे. या सहा जणांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे पुन्हा हिंसा भडकली. गेल्या काही वर्षांपासून मणिपूर अस्वस्थ आहे.

तर इंफालच्या पर्वतीय जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या जावया सहित तीन आमदारांच्या घरावर हल्ला करण्यात आला. सामानाची नासधूस करण्यात आली. त्यांच्या संपत्तीला आग लावण्यात आली. यावेळी सुरक्षा दलाने आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे.

भाजपाच्या आमदाराच्या घरावर हल्लाबोल

पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेची माहिती दिली. भाजपाच्या आमदाराच्या घराची हिंसक जमावाने तोडफोड केली. त्यांच्या संपत्तीला आग लावली. इंफालम पश्चिममधील तेरा येथे भाजपाचे आमदार सपाम कुंजाकेसोर यांच्या निवासस्थानावर हल्ला चढवला. त्यांच्या संपत्तीची नासधूस केली. घरासमोरील वाहनांवर पण हल्लाबोल केला.

बोरोब्रेका परिसरातील एका पोलीस ठाण्यावर हल्ला

11 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांच्या एका गटाने बोरोब्रेका परिसरातील एका पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला. पण सुरक्षा दलांनी हा हल्ला परतावून लावला. यावेळी जोरदार धुमश्चक्री झाली. त्यात 11 दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी अतिरेक्यांनी पोलीस स्टेशन जवळील मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन लहान मुलांचे अपहरण केले.

कुकी आणि मैतेई गटात हिंसाचार

राज्य सरकारने शनिवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. मणिपूर येथे दीड वर्षात कुकी आणि मैतेई या दोन समुदायात हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. या दोन्ही समाजात शांततेचे सर्व प्रयत्नांना अपयश आले आहे. या दोन्ही समुदायात वारंवार हिंसाचार भडकत आहे.