Manipur Violence: मणिपूर पेटलेलेच…; भाजप आमदारांच्या कार्यालयावरच आंदोलनकर्त्यांनी केले लक्ष्य

| Updated on: May 29, 2023 | 12:56 AM

राज्यात मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये प्रचंड मोठा आता हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसामच्या दौऱ्यात स्पष्ट केले आहे की, ते लवकरच मणिपूरला भेट देणार असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समुदायांच्या वरिष्ठांना भेटण्याची शक्यता आहे.

Manipur Violence: मणिपूर पेटलेलेच...; भाजप आमदारांच्या कार्यालयावरच आंदोलनकर्त्यांनी केले लक्ष्य
Follow us on

इंफाळ : मणिपूरमध्ये तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेला हिंसाचार अजूनही थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत. निमलष्करी दल आणि पोलिसांनी रविवारी झालेल्या चकमकीत 40 बंडखोरांना ठार करण्यात आले आहे. मात्र, सरकारच्या कारवाईला न जुमानता येथील हिंसाचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. रात्री उशिरा मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून भाजप आमदाराच्या कार्यालयावर थेट बंडखोरांनीच हल्ला केल्याचे सांगितले आहे.

राज्यातील उरीपोक भागात भाजप आमदार खवैरकपम रघुमणी यांच्या कार्यालयावर एकाच वेळी अनेक बंडखोरांनी हल्ला केला आहे.

येथे त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तर राज्यात आधीच कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच, ज्या भागात परिस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणी प्रशासनाकडून कर्फ्यू शिथिलतेचे तास कमी करण्यात आले आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी रविवारीच याविषयी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या ठिकाणी किमान बंडखोरांना मारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

चकमकीत मारले गेलेले लोक नागरिकांविरुद्ध अत्याधुनिक शस्त्रे वापरत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. याविषयी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, या बंडखोरांव्यतिरिक्त दहशत पसरवणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हिंसाचारामुळे राज्यात इंटरनेटवरही 31 मे पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याकडूनही ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यात मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये प्रचंड मोठा आता हिंसाचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी आसामच्या दौऱ्यात स्पष्ट केले आहे की, ते लवकरच मणिपूरला भेट देणार असून शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही समुदायांच्या वरिष्ठांना भेटण्याची शक्यता आहे.

यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. राज्यातील चुराचंदपूर आणि बिष्णुपूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातून सातत्याने हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत.

त्यामुळे या भागात कर्फ्यू अधिक कड लावला आहे. यापूर्वी याच भागात भाजपच्या एका मंत्र्याच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.