करोडपती चहावाला ! प्रफुल्लने खरेदी केलेल्या गाडीची किंमत ऐकून धक्काच बसले

एमबीए चायवाला अशी ओळख निर्माण करणाऱ्या या युवा उद्योजकाने नवीन कार खरेदी केली आहे. चहा विकून देखील इतकी महागडी कार खरेदी करु शकतो याचा कोणी विचार ही केला नसेल. पण या युवा उद्योजकाने ते शक्य करुन दाखवलंय.

करोडपती चहावाला ! प्रफुल्लने खरेदी केलेल्या गाडीची किंमत ऐकून धक्काच बसले
| Updated on: Feb 14, 2023 | 7:53 PM

मुंबई : एमबीए चाय वाला म्हणून ओळख असलेले प्रफुल्ल बिलोरे याने नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याचा संघर्ष इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. MBA सोडून त्याने 2017 मध्ये IIM अहमदाबादच्या बाहेर चहाचा स्टॉल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. प्रफुल्ल बिलोर आता देशभरात ‘एमबीए चाय वाला’ म्हणून ओळखला जातो. एक यशस्वी ब्रँड चालवणारा, प्रफुल्ल बिलोरे हा एक प्रेरक वक्ता देखील आहे जो तरुणांना आपल्या प्रेरणादायी कथेने मार्गदर्शन करतो.

प्रफुल्ल बिलोरेने 90 लाख रुपयांची नवीन लक्झरी मर्सिडीज-बेंझ एसयूव्ही खरेदी केली आहे. त्याचे 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने त्याच्या मर्सिडीज एसयूव्हीची डिलिव्हरी घेतानाचा व्हिडिओ Instagram वर शेअर केला आहे.

‘MBA चाय वाला’ ने मर्सिडीज-बेंझ GLE लक्झरी SUV खरेदी केली आहे. इंस्टाग्रामवर त्याने याचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

प्रफुल्लचे देशभरात आज १०० हून अधिक फ्रेंचायजी आऊटलेट आहेत. ज्याच्या माध्यमातून तो आज लाखो रुपये कमवत आहे.

फोटो शेअर करत प्रफुल्लने म्हटलं की, ‘देवाच्या आशीर्वाद, कुटुंबाची साथ, सगळ्यांची मेहनत आणि जगभरातील लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद यामुळे आज आम्ही  Mercedes GLE 300D ही नवीन कार घरी आणली. देव सगळ्यांना यश देवो.’