तिकीट मिळाले नाही म्हणून खासदाराने विषप्राशन केले, पाहा कुठे घडली घटना?

| Updated on: Mar 25, 2024 | 2:38 PM

लोकसभेच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. ज्यांना तिकीट मिळाले आहेत. त्यांची धुळवड जोरात साजरी होत आहे. तर ज्यांना तिकीट मिळालेले नाहीत. ते नाराज झाले आहेत. अशात एका खासदाराने तिकीट न मिळाल्याने थेट किटकनाशक प्राशन केल्याची घटना घडली आहे.

तिकीट मिळाले नाही म्हणून खासदाराने विषप्राशन केले, पाहा कुठे घडली घटना?
new parliament building
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध पक्षांनी आपआपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आपला तिकीट मिळावे म्हणून अनेक जण देव पाण्यात ठेवून बसले होते. ज्यांना तिकीट मिळाले आहे ते आनंदाने नाचत आहेत तर ज्यांचे तिकीट कापले गेले ते हिरमुसले आहेत. तामिळनाडूतील इरोडचे खासदाराने मात्र त्यांना तिकीट जाहीर झाल्याने भलतेच मनाला लावून घेतले आहे. त्यांनी थेट विषप्राशन केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तामिळनाडू येथील इरोडचे लोकसभा खासदार ए.गणेशमूर्ती यांनी रविवारी थेट विष प्राशन केल्याचे उघडकीस आले. ते त्यांच्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत सापडले. असे म्हटले जाते की ए. गणेशमूर्ती यांनी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. हॉस्पिटलने त्यांचे मेडीकल अपडेट जाहीर केलेले नाहीत. एमडीएमके नेत्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की डीएमके पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिल्याने ते मानसिक दडपणाखाली होते. त्यातून नैराश्य आल्याने त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

ए. गणेशमूर्ती हे 76 वर्षांचे आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत ए.गणेशमूर्ती यांनी आपल्या एआयएडीएमके प्रतिस्पर्धी जी. मणिमारन यांना 2,10,618 मतांनी हरविले. या निवडणूकीत एमडीएमकेचे संस्थापक वायको यांनी त्यांचा मुलगा दुरई वायको यांच्या उमेदवारीला प्राधान्य दिले. आणि एमडीएमकेला इरोड ऐवजी तिरुची सीट मिळावी यासाठी प्रयत्न केला.

ई. प्रकाश यांना तिकीट

डीएमके पक्षाने ए.गणेशमूर्ती यांच्या जागी इरोड येथून युवा नेते के.ई. प्रकाश यांना मैदानात उतरविले आहे. प्रकाश हे तामिळनाडूचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन याचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन याचा जवळचा मानले जातात.

वायको यांनी लपवून ठेवले

एमडीएमके नेते आणि वायको याचे पूत्र दुरई यांनी कोयंबटूनच्या खाजगी रुग्णालयांचा दौरा केला आणि गणेशमूर्ती यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर दुरई वायको यांनी मिडीयाशी काहीही संवाद केला नाही. गणेशमूर्ती यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने सांगितले की वायको यांनी त्यांना तिकीट न देण्यासंदर्भातील बदलाची माहीती दिली नव्हती. त्यामुळे जेव्हा तिकीट कापले गेल्याची थेट माहीत मिळाल्याने ते तणावात आले आणि त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.