
भारतीय पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एक ऐतिहासिक यश संपादन केले आहे. कुवेत ऑइल कंपनी (KOC) कडून 225.5 दशलक्ष डॉलर्स (KWD 69.23 दशलक्ष) किमतीचे काम MEIL ला मिळाले आहे.
या प्रकल्पांतर्गत पश्चिम कुवेतमधील तेलक्षेत्रांमध्ये गॅस स्वीटनिंग आणि सल्फर रिकव्हरी फॅसिलिटी (NGSF) ची रचना, बांधकाम, संचालन आणि देखभाल केली जाणार आहे. हा प्रकल्प बिल्ड-ओन-ऑपरेट (BOO) तत्त्वावर राबविला जाणार असून, KOC ला या सुविधा परत विकत घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
भारतीय कंपन्यांची आंतराष्ट्रीय घौडदौड
ही सुविधा 790 दिवसांत पूर्ण केली जाईल, त्यानंतर पाच वर्षांसाठी तिचे संचालन आणि देखभाल MEIL करेल. शुद्ध केलेला वायू निर्जलीकरण करून मीना अहमदी रिफायनरी येथील LPG प्लांटमध्ये पाठवला जाईल. हा प्रकल्प कुवेतच्या स्वच्छ इंधन उत्पादन आणि पर्यावरणीय सुरक्षिततेच्या धोरणांच्या मानकांचे पालन करणारा असणार आहे.
या करारामुळे MEIL ने मध्य पूर्वेतील तेल आणि वायू क्षेत्रात आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. राजस्थान आणि मंगोल रिफायनरीसाठी SRU प्रकल्प राबवून MEIL ने हायड्रोकार्बन क्षेत्रातील आपली कौशल्य सिद्ध केले आहे. MEIL समृह मंगोलिया, टांझानिया, आणि इतर देशांमध्ये पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि हायड्रोकार्बन क्षेत्रातील अनेक प्रकल्पांचे काम करत आहे. अशा प्रकल्पांमुळे भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळत आहे.