MEIL ची झोजिला टनेल प्रकल्पात विक्रमी कामगिरी, श्रीनगर ते लडाख वाहतूक होणार सुसाट

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने विक्रमी वेळेत 18-किमी लांबीच्या झोजिला बोगद्यांपैकी एक महत्वाचा टप्पा असणाऱ्या 5 किमी लांबीच्या बोगद्याचे काम पुर्ण केल. हे काम कंपनीने विक्रमी वेळेत म्हणजे फक्त 14 महिन्यात पुर्ण केल आहे.

MEIL ची झोजिला टनेल प्रकल्पात विक्रमी कामगिरी, श्रीनगर ते लडाख वाहतूक होणार सुसाट
झोजिला बोगदा
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 9:45 PM

पायाभूत सुविधा क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने विक्रमी वेळेत 18-किमी लांबीच्या झोजिला बोगद्यांपैकी एक महत्वाचा टप्पा असणाऱ्या 5 किमी लांबीच्या बोगद्याचे काम पुर्ण केल. हे काम कंपनीने विक्रमी वेळेत म्हणजे फक्त 14 महिन्यात पुर्ण केल आहे. नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) आणि MEIL द्वारे राबविण्यात येत असलेला हा प्रकल्प, श्रीनगर आणि लडाख दरम्यान वर्षभर विनाखंड दळवळण होण्यासाठी खुप महत्वाचा आहे. झोजिला बोगदा समुद्र सपाटीपासून सरासरी 3,528 मीटर उंचीवर आहे. बर्फवृष्टी आणि हिमवादळ यांसारख्या प्रतिकूल हवामानातही हा प्रकल्प जलदगतीने पुर्ण केला जात आहे. झोजिला प्रकल्प, आशियातील सर्वात लांब दुपदरी बोगदा आहे आणि भारतातील धोरणात्मक नियोजन प्रकल्पापैकी एक आव्हानात्मक विकास प्रकल्प आहे.

श्री हरपाल सिंग, झोजिला टनेलचे प्रकल्प प्रमुख म्हणाले, “आमच्या MEIL टीमने हा प्रकल्प अत्यंत खडतर परिस्थितीत मोठ्या परिश्रमाने पूर्ण केला आहे.” सध्याच्या हिवाळ्यात जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक हिमवृष्टी झाली असून तापमान -30 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. या प्रकल्पात तीन बोगदे, चार पूल, बर्फ संरक्षण संरचना, कल्व्हर्ट, कॅच डॅम, डिफ्लेक्टर डॅम, कट आणि कव्हर बोगदा आणि अशा अनेक अभियांत्रिकी आव्हानांचा समावेश आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या आधीच्या प्रकल्प भेटीदरम्यान जलद गतीने प्रकल्प राबविण्याच्या MEIL च्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. या प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाखची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, वाहतूक आणि पर्यटन सुधारेल.

झोजिला बोगदा प्रकल्पाबद्दल

MEIL ह्या भारतातील महत्वाच्या पायाभूत सुविधा कंपनीला 01 ऑक्टोबर 2020 रोजी काश्मीर खोऱ्याला लडाखशी जोडणारा वर्षभर दळवळणाची सुविधा देणारा हा प्रकल्प (ZOJILA PROJECT) प्रदान करण्यात आला. प्रकल्पाची एकूण लांबी 32 किलोमीटर आहे आणि दोन भागात विभागली गेली आहे. प्रकल्पाच्या 18 किमीचा भाग सोनमर्ग आणि तलताल यांना जोडतो, त्यात मोठे पूल आणि बोगदे आहेत. टनेल T1 मध्ये दोन बोगदे नियोजित आहेत. MEIL ने प्रकल्पा पर्यतचे रस्ते बांधल्यानंतर मे 2021 मध्ये काम सुरू केले आहे. हिमालयात बोगदा खणण हे नेहमीच कठीण काम असते, परंतु MEIL ने दोन्ही बोगद्याचे काम वेळापत्रकानुसार सुरक्षिततेच्या मानकासह ,आधुनिक यंत्रसामुग्रीचा योग्य वापर करत आणि अतिशय वेगाने सुरु ठेवले आहे. 13.3 किमी लांबीच्या झोजिला मुख्य बोगद्याचे कामही जोरात सुरू आहे. MEIL ने लडाखपासून 600 मीटर आणि काश्मीरच्या बाजूने 300 मीटर काम पुर्ण केल आहे.

MEIL चा इतिहास

Megha Engineering & Infrastructures Limited (MEIL) ही भारतातील हैदराबाद येथे मुख्यालय असलेली एक प्रमुख बहु-क्षेत्रीय जागतिक कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1989 मध्ये झाली. गेल्या तीन दशकात तिने 60 देशांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सिंचन, तेल आणि वायू, वाहतूक, वीज, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रात कंपनी कार्यरत आहे. तेलंगणातील कालेश्वरम हा जगातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशन प्रकल्प पूर्ण करण्यात MEILची महत्वाची भूमिका होती. MEIL ने विविध आव्हानात्मक अभियांत्रिकी प्रकल्प आपल्या इंजिनीअरींगच्या कौशल्य आणि अंगीभूत कार्यक्षमतांसह कार्यान्वित केले आहेत.

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

Punjab Assembly Election : मुख्यमंत्री चन्नी यांच्याकडून नागरिकांना गिफ्ट, पंजाबमध्ये वीज 3 रुपये स्वस्त

Goa Assembly Election: बेरोजगारांना 3000/-, 18 वर्षावरील महिलांना 1000/-, केजरीवालांची घोषणा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.