Prophet Muhammad Protest: शुक्रवारची नमाज अदा झाली अन् दिल्ली ते कोलकात्ता घोषणाबाजी, पैगंबराबद्दलच्या वक्तव्याचा वाद पेटला

| Updated on: Jun 10, 2022 | 4:49 PM

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे सांगितले आहे.

Prophet Muhammad Protest: शुक्रवारची नमाज अदा झाली अन् दिल्ली ते कोलकात्ता घोषणाबाजी, पैगंबराबद्दलच्या वक्तव्याचा वाद पेटला
जामा मशिद
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : प्रेषित मंहम्मद पैगंबर (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद थांबताना दिसत नाही. शुक्रवारच्या नमाजानंतर देशातील अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. याच्याआधीही याचवरून गेल्या आठवड्यात कानपूरमध्ये हिंसाचार उसळला होता. आता दिल्लीतील जामा मशिदीत (Jama Masjid in Delhi) मुस्लीम समाजातील लोक आज शुक्रवारच्या नमाजसाठी एकत्र आले होते. यानंतर येथे लोकांनी जमाव करून आंदोलन केले. तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर हा वाद आता दिल्लीतील जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि यूपीच्या अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात उग्र निदर्शने होताना दिसत आहेत. तसेच यूपीची राजधानी लखनऊशिवाय देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही नुपूरच्या अटकेच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. तर यामुळे पोलिसांनी देवबंदमध्ये आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

जामा मशिदीत घोषणाबाजी

जामा मशिदीत मुस्लीम समाजातील लोक आज शुक्रवारच्या नमाजसाठी एकत्र आले होते. यानंतर येथे लोकांनी जमाव करून आंदोलन केले. तसेच नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यासोबतच लोकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांचे सांगितले आहे. जामा मशिदीच्या शाही इमामाचे म्हणणे आहे की, त्यांना या निषेधाबद्दल काहीही माहिती नाही. तसेच मशिदीकडून आंदोलन पुकारण्यात आलेले नाही.

हे काम जामा मशिदीचे नाही

हेट स्पीचवरून करण्यात आलेल्या जामा मशिदीतील आंदोलनावर बोलताना शाही इमामाने म्हणाले की, जामा मशिदीबाहेर आज असे काही होईल याची त्यांना माहिती नव्हती. तसेच हे आंदोलन जामा मशिदीने पुकारले नाही. ते म्हणाले, जामा मशीद चौकात म्हणजे गेट क्रमांक एकवर काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. हे लोक कोण आहेत, पोलिस शोधून काढतील. हे लोक कोण आहेत आणि कोणी या घोषणा दिल्या हे पोलिसांना कळेल. कोणालाच माहीत नव्हते, मला वाटते की पोलिसांनाही हे माहीत नव्हते की निदर्शन होणार आहे.

यूपीमध्ये शहरा-शहरांत गोंधळ

शुक्रवारच्या नमाजानंतर उत्तर प्रदेशातील लखनऊ, प्रयागराज, सहारनपूर आणि देवबंदमध्ये नुपूर शर्माविरोधात निदर्शने झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे देवबंदमध्येही पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी परिस्थिवर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना खूप प्रयत्न करावे लागले आहेत. तर मुरादाबादच्या मुगलपुरा भागातही आज शुक्रवारच्या नमाजानंतर अचानक असे निदर्शने करण्यात आली. यावेळी काही लोक चौकाचौकात आले आणि त्यांनी निदर्शने केली. यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांनी सर्वांना शांत करून घरी पाठवले.

कोलकात्यातही वादंग

काय झलं होतं?

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या, मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते.

दिल्ली पोलीसांचे कडक पाऊल

दुसरीकडे नुपूर शर्माच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीसांनी कठोर भुमिका घेण्याचे ठरवले आहे. नुकतेच त्यांनी नुपूर शर्मा, असदुद्दीन ओवेसी यांच्यासह 32 जणांवर भडकाऊ वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
तर भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते नुपूर शर्मा, नवीन जिंदाल, असदुद्दीन ओवेसी, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अन्सारी यांच्यावर दिल्ली पोलिसांच्या सायबर युनिटने वेगवेगळ्या विरोधात अशोभनीय वक्तव्य करून वातावरण बिघडवल्याचा आरोप केला आहे. यती नरसिंहानंद, दानिश कुरेशी, विनिता शर्मा, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.