मायक्रोसॉफ्टमधून 60000 कर्मचाऱ्यांच्या धाड… धाड… जाणार नोकऱ्या, कंपनीचा थेट निर्णय, भारतातील..

मायक्रोसॉफ्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर मोठी गदा आली. एआयमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. मायक्रोसॉफ्टने खास योजना कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली. स्वत:च्या मर्जीने कर्मचारी नोकऱ्या सोडत असतील तर त्यांना खास सुविधा मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टमधून 60000 कर्मचाऱ्यांच्या धाड... धाड... जाणार नोकऱ्या, कंपनीचा थेट निर्णय, भारतातील..
Microsoft
| Updated on: Oct 27, 2026 | 6:50 AM

मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी म्हणजे नशीब उजळले, असे म्हटले जाते. ही जगातील मोठी कंपनी आहे. या कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना असंख्य अशा मोठ्या सुविधा दिल्या जातात. मात्र, भारत, ब्रिटेन, अमेरिका आणि कॅनडामधील मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्येत चांगलीच मोठी वाढ झाली. थेट धाड.. धाड… त्यांच्या नोकऱ्या जाणारआहेत. काही कर्मचाऱ्यांसाठी स्वत:च्या मर्जीने नोकरी सोडण्याची योजना सुरू करण्यात आली. त्यांचे म्हणणे आहे की, काम अधिक व्यवस्थित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआय क्लाउड टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात केली जाणार आहे. मात्र, या योजनेत ते कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून न देता, त्यांना प्रत्येक मदत करणार आहेत.

कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य मानव संसाधन अधिकारी एमी कोलमॅन यांनी ब्लॉग पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. या चारही देशात टीम या कर्मचाऱ्यांसाठी काम करेल. जगभरातील त्यांच्या कंपनीतील तब्बल 60000 कर्मचारी याकरिता पात्र ठरवण्यात आलीत. त्यांचा जॉब ग्रेड 70 पेक्षाखाली आहे. भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये जवळपास 23000 कर्मचारी काम करतात.

Loading...

नक्की कोणत्या देशातून किती कर्मचाऱ्यांना काढायचे, याबाबत अजून आकडेवारी पुढे आली नाही. म्हणजे भारतातून नक्की किती कर्मचाऱ्यांना काढले जाणार आहे, हे पुढे आले नाही. पण कंपनीकडून पूर्ण प्लान तयार आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांना 1 डिसेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला. कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत करिअर संधी दोन्हीही मिळणार आहे. नव्या नोकरीसाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

यासोबतच हेल्थ इंशुरन्स देखील त्यांना देण्यात आला. कोलमॅन यांनी म्हटले की, या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना बाहेर नोकऱ्या शोधण्यासाठी एक संधीही मिळेल. याकरिता एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून त्यांना प्रत्येक पद्धतीची मदत केली जाईल. एआयमुळे तब्बल 60000 लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले की, कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीची मदत ही आमच्याकडून दिली जाईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us