AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे.

दिल्लीतून मोठी बातमी! शिक्षण खात्याची जबाबदारी या बड्या नेत्याकडे, केंद्र सरकारची मोठी घोषणा
Pralhad Joshi Gets Additional charge of Education MinisteryImage Credit source: Google
| Updated on: Jul 25, 2026 | 8:40 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आज प्रधान यांनी त्यांच्याकडे असलेल्या शिक्षण खात्याच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. आता या खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. नवीन शिक्षणमंत्र्यांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जोशी या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांना त्यांच्या विद्यमान मंत्रालयांसोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार प्रल्हाद जोशी त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांसोबतच शिक्षण मंत्रालयाचे कामकाजही पाहणार आहेत. मात्र भविष्यात नवीन शिक्षणमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त केले जाणार आहे.

प्रल्हाद जोशी या खात्याचे मंत्री

प्रल्हाद जोशी हे कर्नाटकातील धारवाड मतदारसंघाचे खासदार आहेत. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा या मंत्रालयांचे केंद्रीय मंत्री आहेत. तसेच ते इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे अध्यक्षदेखील आहेत. आता पुढील काही काळ त्यांच्याकडे शिक्षण खात्याचीही जबाबदारी असणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिला राजीनामा

धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा जाहीर करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण करणे आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर तरुणांच्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या आंदोलनाचा फायदा देशविरोधी शक्तींना घेता येऊ नये, यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, केंद्र सरकार आणि कॉकरोच जनता पार्टी यांच्यातील तिसऱ्या फेरीच्या चर्चेच्या काही तास आधी हा राजीनामा देण्यात आला. बैठकीपूर्वी CJP च्या नेत्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा नॉन-नेगोशिएबल असल्याचे स्पष्ट केले होते आणि हीच आंदोलनाची प्रमुख मागणी बनवली होती. त्यामुळे प्रधान यांना पद सोडावे लागले आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं