
सध्या जगात तणाव वाढत चालला आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानने क्रूर दहशतवाद्यांना काश्मीर खोऱ्यात पाठवलं. त्यांनी पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने सुरु केलेलं ऑपरेशन सिंदूर एक प्रकारचं छोट युद्धच होतं. भारताने आधी पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळ उडवले. पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारताने पाकिस्तानला असा धडा शिकवला, जे ते कधी विसरणार नाहीत. भारताने एअर स्ट्राइकद्वारे आपली ताकद दाखवून दिली. त्याचवेळी एअर डिफेन्स सिस्टिमच महत्व लक्षात आलं. भारताची सीमा एकाबाजूला पाकिस्तान तर दुसऱ्याबाजूला चीनला लागून आहे. दोन्ही देशांची भारताबद्दलची भूमिक जगजाहीर आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताकडे S-400 सारखी एअर डिफेन्स सिस्टिम होती. त्यामुळे पाकिस्तानचे हवाई हल्ले यशस्वी होऊ शकले नाहीत.
पण त्या अनुभवाने देशाकडे एअर डिफेन्स सिस्टिम यापेक्षाही मजबूत, भक्कम हवी हे स्पष्ट केलं. म्हणूनच भारत आता चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांचा एकाचवेळी सामना करण्यासाठी स्वत:ला सज्ज करत आहे. इंडियन एअरफोर्सने संरक्षण मंत्रालयासमोर रशियाकडून S-400 ट्रायंफ एअर डिफेंस सिस्टिमचे 5 अतिरिक्त स्क्वाड्रन खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत यावर गांभीर्याने विचार करत आहे. भारत स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिम ‘मिशन सुदर्शन चक्र’वर सुद्धा काम करतोय. देशी एअर डिफेन्स सिस्टिम डेवलप करण्याची मोहिम आता आकाराला येत आहे.
मिशन सुदर्शन चक्र प्रोजेक्ट लॉन्च करण्याची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी संपूर्ण देशाला एअर डिफेन्सच कवच देण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र प्रोजेक्ट लॉन्च करण्याची घोषणा केली होती. या सिस्टिमचं स्वरुप कसं असेल? ती कशी काम करेल? याचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालय. ‘सुदर्शन चक्र’ अस्तित्वात आल्यानंतर आर्यन डोम आणि THAAD सारखी एअर डिफेन्स सिस्टिमही त्यासमोर कमी वाटेल. मिशन सुदर्शन चक्रबद्दल आतापर्यंत जे डिटेल समोर आलेत, त्यानुसार जमिनीपासून आकाश आणि समुद्रापर्यंत एक अभेद्य सुरक्षा कवच निर्माण केलं जाईल.
आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने पावलं उचलली
स्वदेशी एअर डिफेन्स सिस्टिममुळे हजारो किलोमीटर अंतरावरील हवाई धोकाच समजणार नाही, तर तो नष्ट करणही शक्य आहे असं डिफेन्स एक्सपर्ट्स म्हणणं आहे. भारताने आपली संरक्षण क्षमता आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने पावलं उचलली आहेत. मिशन सुदर्शन चक्र अंतर्गत अशा एअर डिफेन्स सिस्टिमची निर्मिती केली जातेय जे वेळीच जमीन, आकाश आणि अवकाश तिन्ही ठिकाणावरुन होणारा हल्ला ओळखून नष्ट करेल. सुदर्शन चक्र हे भगवान श्रीकृष्णाच अस्त्र होतं.
ही सिस्टिम ढाल आणि तलवार
त्याचप्रमाणे ही एअर डिफेन्स सिस्टिम प्रहार आणि देशाचं संरक्षण दोन्ही कामं एकाचवेळी करेल. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्यानुसार ही सिस्टिम ढाल आणि तलवार बनून काम करेल. हे सुरक्षा कवच बॅलेस्टिक मिसाइल, क्रूज मिसाइल, ड्रोन, हायपरसोनिक वेपन आणि शत्रुच्या फायटर जेट्सचा खात्मा करेल. ‘इंडिया डिफेंस रिसर्च विंग’च्या रिपोर्टनुसार, या मिशनचा संपूर्ण खर्च ₹130000 से ₹170000 पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.