Mission Sudarshna Chakra : पंतप्रधान मोदींकडून मिशन सुदर्शन चक्रची मोठी घोषणा, काय आहे हा प्रोजेक्ट?
Mission Sudarshna Chakra : भगवान श्रीकृष्ण यांचं सुदर्शन चक्र होतं. त्याच चक्राचा मार्ग निवडला आहे. महाभारतात युद्ध सुरु असताना श्रीकृष्णाने त्याच सुदर्शन चक्राचा वापर करुन सूर्याचा प्रकाश रोखलेला आणि दिवसा अंधार केलेला. त्यावेळी अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्याची जी शपथ घेतलेली, ती पूर्ण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. यावेळी ते एअर डिफेन्स सिस्टिमबद्दल बोलले. “मी संकल्प केलाय, यासाठी मला देशवासियांचा आशिर्वाद हवा आहे. कितीही समृद्धी झाली, पण सुरक्षा नसेल, तर त्याला महत्त्व नाही” असं पीएम मोदी म्हणाले. “मी लाल किल्ल्यावरुन हे सांगतोय येणाऱ्या 10 वर्षात म्हणजे 2035 पर्यंत देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी, यात रणनितीक आणि सिविलियन क्षेत्र आहे, जसे की रुग्णालय, रेल्वे, आस्था केंद्र त्यांना टेक्नोलॉजीच्या नव्या प्लॅटफॉर्मद्वारे पूर्णपणे सुरक्षा कवच दिलं जाईल” असं पीएम मोदी यांनी जाहीर केलं.
“हे सुरक्षा कवच विस्तृत असेल. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. कुठलीही टेक्नोलॉजी येऊ दे, आपली टेक्नोलॉजी त्याचा सामना करण्यास सक्षम असेल. मला 2035 पर्यंत त्या राष्ट्रीय कवचाला विस्तार द्यायचा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भगवान श्रीकृष्ण यांचं सुदर्शन चक्र होतं. त्याच चक्राचा मार्ग निवडला आहे. महाभारतात युद्ध सुरु असताना श्रीकृष्णाने त्याच सुदर्शन चक्राचा वापर करुन सूर्याचा प्रकाश रोखलेला आणि दिवसा अंधार केलेला. त्यावेळी अर्जुनाने जयद्रथाचा वध करण्याची जी शपथ घेतलेली, ती पूर्ण केली. हे सुदर्शन चक्रामुळे शक्य झालेलं. आता देश मिशन सुदर्शन चक्र लॉन्च करेल.
सुदर्शन चक्राच टार्गेट काय?
भारताच हे सुदर्शन चक्र म्हणजे ताकदवान वेपन सिस्टिम आहे. ही सिस्टिम शत्रुचा हल्ला फक्त रोखणारच नाही, तर त्यापेक्षा डबल शक्तीने पलटवार करेल. आम्ही मिशन सुदर्शन चक्रसाठी काही मूलभूत गोष्टी निश्चित केल्या आहेत असं पीएम मोदी म्हणाले. आम्हाला 10 वर्षात ते विकसित करायचं आहे. त्याच्या निर्मितीपासून ते रिसर्च देशातच होईल. वॉरफेयरच्या दृष्टीने आम्ही प्लस वनच्या नितीने काम करु. सुदर्शन चक्राच एक वैशिष्ट्य होतं, जे टार्गेट होतं, तिथेपर्यंत ते जायचं. मग पुन्हा मागे फिरायचं. आम्ही सुद्धा सुदर्शन चक्राप्रमाणे टार्गेटनुसार पुढे जाऊ असं पीएम मोदी म्हणाले.
