मोदी सरकार-3: सत्तेवर येताच पहिल्या 125 दिवसांत काय करणार मोदी सरकार, असा हा रोडमॅप

Narendra Modi: निवडणूक दरम्यान आमची सरकार एक क्षणही वाया घालवणार नाही. सरकारने निकालानंतर पहिल्या 125 दिवसांत काय कामे केली जाणार आहेत, त्याचा रोडमॅप तयार केला आहे. त्यात 25 दिवस फक्त युवकांसाठी ठेवण्यात आले आहेत.

मोदी सरकार-3: सत्तेवर येताच पहिल्या 125 दिवसांत काय करणार मोदी सरकार, असा हा रोडमॅप
pm narendra modi (1)
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: May 30, 2024 | 4:41 PM

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार आहे. आता 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांनी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार सत्तेवर येताच पहिल्या 125 दिवसांत काय काम करणार, हे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पंजाबमधील होशियारपूर येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी सरकार 3.0 चा पहिल्या 125 दिवसांचा रोडमॅप सांगितला.

25 दिवस फक्त युवकांसाठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी प्रचार सभेत बोलताना सांगितले की, निवडणूक दरम्यान आमची सरकार एक क्षणही वाया घालवणार नाही. सरकारने निकालानंतर पहिल्या 125 दिवसांत काय कामे केली जाणार आहेत, त्याचा रोडमॅप तयार केला आहे. त्यात 25 दिवस फक्त युवकांसाठी ठेवण्यात आले आहेत. पुढील पाच वर्षांत कोणते मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत, त्याची रुपरेषाही तयार केली आहे. तसेच पुढील 25 वर्षांच्या व्हिजनवर सरकार वेगाने काम करत आहे.

प्रत्येक भारतीयांचा आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील लोकांच्या आज अनेक अपेक्षा आहेत. देशात नवीन आत्मविश्वास आला आहे. दशकानंतर पूर्ण बहुमत असणारी सरकारची हॅट्ट्रीक होणार आहे. त्यासाठी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विकसित भारताचे पाहिले स्वप्न आहे. आज प्रत्येक भारतीय या स्वप्नामुळे एकत्र आला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक भारतीयांचा आम्हाला आशीर्वाद मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारची परराष्ट्र नीती सांगत म्हटले की, आज पंजाबमधील लोक विदेशात गेल्यावर पाहतात, त्या ठिकाणी भारताचा सन्मान वाढला आहे. जेव्हा देशातील सरकार दमदार असते तेव्हा विदेशी सरकार आमचा दम पाहते. ही सरकार दमदार आहे. शत्रूंना घरात जावून ठोकणारी ही सरकार आहे. भारताला समृद्ध बनवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार, अशी घोषणा आता दिली जात आहे.