Monsoon : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! तब्बल 5 दिवस… या तारखेला केरळमध्ये दाखल होणार

Monsoon Update : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये तब्बल 5 दिवस आधी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Monsoon : मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी! तब्बल 5 दिवस... या तारखेला केरळमध्ये दाखल होणार
Monsoon Rain
Image Credit source: Google
| Updated on: May 15, 2026 | 8:40 PM

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील तापमानात वाढ झाली असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशातच आता मान्सूनबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळमध्ये तब्बल 5 दिवस आधी दाखल होणार असून, त्यानंतर हळूहळू संपूर्ण देशभर मान्सूनचा विस्तार होणार आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागात वेळेआधीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या तारखेला केरळमध्ये दाखल होणार

मान्सून साधारणपणे केरळमध्ये 1 जूनला पोहोचतो, मात्र यंदा तो तब्बल 5 दिवस आधी म्हणजे 26 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर दाखल होईल. त्यानंतर तो पश्चिमेकडे सरकत भारतात पुढे येईल आणि 26 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, हवामान विभागाने यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

5 दिवस आधी मान्सूनची एन्ट्री

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गाझियाबाद आणि नोएडा येथे धुळीच्या वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीच्या मते, यंदा मान्सून 5 दिवस आधी येण्याची शक्यता असली तरी पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस कमी का पडणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. यामागे एल निनोची परिस्थिती हे संभाव्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. यंदा केवळ 80 सेंटीमीटर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. सिंचनासाठी पाण्याची कमतरता निर्माण होऊन शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे.

Follow Us