पोल्ट्री फार्मच्या ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूंनी मारहाण करुन ठार केले, दोघांना अटक

या घटनेनंतर गावकऱ्यांनी दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की जर अशा लोकांवर कठोर पाऊल उचलत भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी केली जात आहे.

पोल्ट्री फार्मच्या ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूंनी मारहाण करुन ठार केले, दोघांना अटक
poultry farm : file photo
| Updated on: Sep 10, 2025 | 3:15 PM

उत्तर प्रदेशातालील कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर तालुक्यात एका कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अज्ञातांनी शिरुन ४०० हून अधिक कोंबड्यांना बांबूने मारुन त्यांना ठार केल्याचा प्रकार घडला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर घबराट पसरुन शेतकरी संतप्त झाले आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोन आरोपींना अटक केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कानपुरच्या बिल्हौर तहसीलच्या गोहोलियापुर गावात शुक्रवारी रात्री उशीरा थरकाप उडविणारी ही घटना घडली. गावातील एका कोंबड्यांच्या फार्ममध्ये अचानक सामाजिक तत्वांनी हल्लाबोल करीत काटोरी तारांनी गुंडाळलेल्या बाबूंनी ४०० हून अधिक कोंबड्यांना निदर्यीपणे ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.

शनिवारी सकाळी जेव्हा ही घटना गावकऱ्यांना समजली तर संपूर्ण परिसरात दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले. इतक्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांना अशा प्रकारे ठार केल्याने या मागे काय हेतू होता याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. या घटनेने गावातील शांतता आणि सुरक्षा दोन्हीसाठी गंभीर धोका उत्पन्न निर्माण झाला आहे.

४०० हून अधिक कोंबड्यांना निदर्यीपणे ठार केले

माहिती मिळताच बिल्हौर कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मृत कोंबड्यांचा पोस्टमार्टेम करण्यासाठी सरकारी पशु आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. या दरम्यान पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघा आरोपींवर गुंडगिरी केल्याचे आणि यापूर्वी गावात अराजकता पसरवल्याचे आरोप आहेत. यांच्या गुंडगिरीमुळे गावकरी आधीपासूनच त्रस्त आहेत. पोलिसांनी या दोघांना अटक केली असून अशी घटना पुन्हा होऊ नये अशी मागणी केली आहे.