
प्रेम प्रकरणातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं आहे. यावेळी प्रियकराची हत्या झालेली नाहीये, तर प्रेमात वेड्या झालेल्या आईने प्रियकराच्या मदतीनं आपल्याच मुलीची हत्या केली आहे. कळस म्हणजे या आरोपी महिलेनं मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह बेडखाली लपून ठेवला, त्यानंतर त्याच रुमध्ये तिने आपल्या प्रियकरासोबत डान्स आणि दारूची पार्टी देखील केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
ही घटना लखनऊच्या कैसरबाग परिसरात घडली आहे. रोशनी असं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव आहे रोशनीचं दहा वर्षांपूर्वी शाहरुख नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं. या दोघांना एक सात वर्षांची मुलगी देखील होती, सायनारा उर्फ सोना असं या मुलीचं नाव होतं. रोशनी बार डांसर होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर तिने तिची सासू, दोन नंदा आणि दीर यांच्याविरोधात बलात्काराची केस दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं. तसेच पतीला मारहाण करून घरातून बाहेर काढलं होतं. त्यानंतर ती आपल्या प्रियकरासोबत त्याच घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती.
त्यानंतर 13 जुलै रोजी रोशनीने आपला प्रियकर उदित याच्या मदतीनं आपल्या मुलीचा गळा आणि तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह एका बॉक्समध्ये घालून लपून ठेवला. परंतु जेव्हा त्या मृतदेहाचा वास येऊ लागला, तेव्हा त्यांनी तो मृतदेह बाहेर काढला, त्याच्यावर स्प्रे मारला, एसी लावला, संपूर्ण घर फिनेलनं धुतलं, मुलीच्या मृतदेहासमोरच बसून दारू आणि डान्स पार्टी केली, त्यानंतर तिनेच पोलिसांना फोन करून सांगितलं की, माझ्या पतीनं मुलीची हत्या केली, मात्र पोलीस तपासात संपूर्ण सत्य समोर आलं, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींकडून हत्येची कबुली देण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.