AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची डोके चक्रावणारी मागणी, थेट म्हटले, तुम्ही तिला..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये ते विद्यार्थ्यांना माफ करत असल्याचे म्हणताना दिसले. नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असभ्य भाषा बोलणाऱ्या मुलीच्या आईने आता मोठी मागणी केली.

पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या मुलीच्या आईची डोके चक्रावणारी मागणी, थेट म्हटले, तुम्ही तिला..
Narendra Modi
| Updated on: Aug 02, 2026 | 4:16 PM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरणाऱ्या मुलीला त्यांनी यांनी माफ केले. नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत यावर भाष्य केले. यामध्येच नरेंद्र मोदी यांच्याबद्दल चुकीची भाषा वापरणाऱ्या मुलीच्या आईने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, माझ्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माफ करतोय. नरेंद्र मोदी यांनी हे देखील म्हटले की, मुलांकडून चूक होत असते. त्यांना योग्य रस्ता दाखवणे आवश्यक आहे. यावर मुलीच्या आईने म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राजा आहेत. त्यांनी खूप मोठे काम केले. त्यांनी मोठेपणा दाखवून देशाच्या मुलीला माफ केले. मी हात जोडून त्यांचे धन्यवाद मानते. आज तिचा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला जीवनदान दिले. तिचा नवीन जन्म झाला.

मी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करते की, त्यांनी या मुलीला आता दत्तक घ्यावे आणि तिचे जीवन बदलावे. जसे ते गावांना दत्तक घेतात. माझ्या मुलीचे आयुष्य बदलून जाईल, जर तिला दत्तक घेतले तर. यापूर्वी मुलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माफी मागितली होती आणि तिला या गोष्टीची लाज वाटत असल्याचे म्हणते तिने माफी मागितली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, आपल्या मुलीने अशा भाषेचा वापर करणे म्हणजे खूप जास्त चिंजाजनक आहे. पण यादरम्यान त्यांनी हे देखील म्हटले की, मुलांना माफ करणेही आवश्यक आहे. काही लोकांनी जंतर महंतवरील आंदोलनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केला होता. याबाबत बोलताना नरेंद्र मोदी दिसले. मुलीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

आता मुलीच्या आईने केलेल्या मागणीनंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट मुलीला दत्तक घेण्याची विनंती तिच्या आईने केली. आता खरोखरच नरेंद्र मोदी या मुलीला दत्तक घेणार का? यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तिला दत्तक घेऊन तिचे आयुष्य बदलावे, अशी गळच तिच्या आईने घातलीये.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी