मध्य प्रदेशात कोण जिंकणार? भाजप अन् काँग्रेस समर्थकांनी शपथपत्रावर लावल्या लाखोंच्या पैजा

Election | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये निवडणूक प्रचार संपला आहे. आता तीन डिसेंबर रोजी निकाल येणार आहे. या निकालापूर्वी लाखांचा पैजा लागल्या आहेत. उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये ही निवडणूक निकालाची उत्सुक्ता जास्त आहे.

मध्य प्रदेशात कोण जिंकणार? भाजप अन् काँग्रेस समर्थकांनी शपथपत्रावर लावल्या लाखोंच्या पैजा
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 3:46 PM

भोपाळ, दि. 28 नोव्हेंबर 2023 | पाच राज्यातील निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोरममध्ये निवडणूक प्रक्रिया झाली आहे. आता पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबर रोजी येणार आहे. निवडणूक निकालांची सर्वांना उत्सुकता आहे. उमेदवारांचे समर्थक आणि विरोधकांमध्ये ही निवडणूक निकालाची उत्सुक्ता जास्त आहे. त्यासाठी पैजा लावल्या गेल्या आहेत. अगदी एका लाखापासून पाच लाखांपर्यंत पैज लावली आहे. पैजचे शपथपत्रही केले आहे. त्यावर पाच जणांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. उमेदवारांच्या समर्थकांनी केलेले शपथपत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याची चांगली चर्चा रंगली आहे.

साक्षीदाराकडे पैजेचे धनादेश

छिंदवाडा जिल्ह्यात सुखापुरा गावातील धनीराम भलावी आणि नीर मालवीय यांच्यात पैज लागली आहे. भलावी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकाराचा दावा केला आहे. मालवीय भाजप सरकार येणार असल्याचे म्हणतात. एक लाख रुपयांची ही पैज आहे. त्यासाठी या दोघांनी शपथपत्रही केले आहे. तसेच एक, एक लाखांचे धनादेश अमित पांडे या साक्षीदाराकडे दिले आहे. मध्य प्रदेशात इतर ठिकाणी या पद्धतीने अनेक पैजा लागल्या आहे. तसेच सट्टा बाजार सुरु झाला आहे.

हे सुद्धा वाचा

हॉटसीटवर दहा लाखांची पैज

छिंदवाडमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर प्रकाश साहू आणि राम मोहन साहू यांनी दहा लाखांची पैज लावली आहे. प्रकाश शाहू म्हणतात भाजपचे उमेदवार बंटी साहू विजयी होतील. तर राम मोहन यांनी कमलनाथ यांच्या विषयावर पैज लावली आहे. या पैजेसाठी तयार केलेल्या शपथपत्रात तीन साक्षीदारांच्या सह्या आहेत. सोशल मीडियावर हे शपथपत्र व्हायरल झाले आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.