Mughal History : हिंदुस्तानच्या गर्मीमुळे बाबरही होता हैराण, बचावासाठी काय केले होते उपाय?
Mughal History : उन्हाने सर्वांच्याच अंगाची काहिली होत आहे. देशात मान्सूनची चातकासारखी वाट पाहिली जातेय. आजच नाही, काहीशे वर्षांपूर्वी सुद्धा गर्मीमुळे देशात अशीच स्थिती होती. त्यावेळच्या हवामानाबद्दल बाबरने खूपच इंटरेस्टिंग गोष्टीची नोंद करुन ठेवलीय.

देशात गर्मीचे रेकॉर्ड मोडले जात असून रोज नवीन उच्चांकी तापमानाची नोंद होतेय. राजस्थानच्या फलौदीमध्ये तापमानाचा पारा 51 डिग्री सेल्सिअसला पोहोचलाय. उन्हाने सर्वांच्याच अंगाची काहिली होत आहे. देशात मान्सूनची चातकासारखी वाट पाहिली जातेय. आजच नाही, काहीशे वर्षांपूर्वी सुद्धा गर्मीमुळे देशात अशीच स्थिती होती. त्यावेळच्या हवामानाबद्दल बाबरने खूपच इंटरेस्टिंग गोष्टीची नोंद करुन ठेवलीय. बाबरने हिंदुस्तानात मुगल साम्राज्याचा पाया रचला. मुगल बादशाहने बाबरनामा या आपल्या आत्मकथेत इथल्या गर्मीचा उल्लेख केलाय. त्याने लिहिलय की, हिंदुस्तानात मला तीन गोष्टींनी हैराण केलं. इथली गर्मी, दुसरी म्हणजे कडाक्याची थंडी आणि तिसरी धूळ.
आपल्या अन्य पिढ्यांच्या तुलनेत बाबरला भले कमी शासन काळ मिळाला. पण त्याने इथल्या गर्मीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. अनेक गोष्टी बनवून घेतल्या. खासगी बगीचे बांधले. बाबरने गर्मी, धूळ आणि कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी महालात बाथहाऊस बनवले. मुगल बादशाहच असं म्हणण होतं की, हे बाथहाऊस तिन्ही गोष्टींपासून बचाव करेल. बाथ हाऊसच्या मोठ्या भिंतीमुळे गर्मीमध्ये थंडावा राहील. ऋतुच्या हिशोबाने पाणी उपलब्ध केलं जायच. आग्रा येथे काहीवेळ व्यतीत केल्यानंतर यमुना नदी पार करताना बाबरच्या मनात हा विचार आलेला.
बचाव करण्यासाठी दगडांपासून बाथचेम्बर
थंडीपासून बचाव करण्यासाठी दगडांपासून बाथचेम्बर बनवण्यात आले होते. याचे दोन भाग होते. पहिल्या भागात गरम पाणी असायचं. दुसऱ्या भागाचा आंघोळीसाठी वापर केला जायचा. सफेद दगडांपासून बाथचेम्बरची निर्मिती करण्यात आली होती. छप्पर आणि जमिनीसाठी लाल दगडांचा वापर करण्यात आला होता. राजस्थानच्या बयाना येथून हे दगड मागवण्यात आले होते. गर्मीवर उपाय शोधताना बाबरने महालाच्या एका भागात बगीचे आणि तलाव बांधण्याचा आदेश दिला होता. किल्ल्याच्या आत इमारत आणि प्राचीर दरम्यान एक मोकळी जागा होती. तिथे दहा बाय दहाची एक मोठी बावडी बांधण्याचा आदेश दिला होता. बाथहाऊस बांधल्यानंतर बाबरने स्वत:साठी एका खासगी बगीचाच निर्माण केलं होतं. तिथे प्रत्येकाला प्रवेश नव्हता. या गार्डनच्या प्रत्येक कोपऱ्यात गुलाब आणि नरगिसची फुल लावण्यात आली होती.
