मुलायम सिंह यादव यांची प्रकृती नाजूक; परिस्थिती गंभीर झाल्याने आयसीयूमधून सीसीयूमध्ये हलविले…

| Updated on: Oct 06, 2022 | 5:14 PM

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती नाजूक; परिस्थिती गंभीर झाल्याने आयसीयूमधून सीसीयूमध्ये हलविले...
Follow us on

नवी दिल्लीः समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव (Former Chief Minister Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती पुन्हा एकदा नाजून बनली आहे.त्यामुळे गुरुवारी गुरुग्राम मेदांता हॉस्पिटलकडून नवीन त्यांचे हेल्थ बुलेटिन (Health Bulletin) काढले. त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले आहे की, त्यांची प्रकृती चिंताजनक (Critical health) असून त्यांना अजूनही आयसीयूमध्ये ठेवण्ंयात आले आहे.

मुलायम सिंह यादव यांना रविवारी युरिन इन्फेक्शनबरोबरच त्यांना रक्तदाबाचा त्रासही वाढला आहे. त्यांना सध्या श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात आले होते, मात्र तरीही त्यांच्यात कोणतीही सुधारणा होऊ शकली नसल्याने त्यांना आयसीयूमधून सीसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालवल्याने आता त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते आता मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले आहेत. मात्र रुग्णालय प्रशासनाने बाहेरच्या कुणालाही त्यांना भेटता येणार नसल्याचे सांगितले आहे.

रूग्णालयातील वाढत्या गर्दीमुळे आता सपा नेते आणि मुलायमसिंह यादव यांचे धाकटे बंधू प्रा. राम गोपाल यादव यांनी पक्षश्रेष्ठींनाही त्याबाबतच्या कडक सूचना देऊन ठेवल्या आहेत.

प्रा. राम गोपाल यादव यांनी सांगितले की, मुलायम सिंह यादव यांना भेटण्याची कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे रुग्णालयामध्ये येऊन लोकांनी गर्दी करु नका.

गर्दीचा त्रास त्यांना आणि इतर रुग्णांनाही होतो असंही त्यानी सांगितले. तर ज्यांना कुणाला भेटायची इच्छा असेल त्यांनी अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुलायम सिंह यांची प्रकृती खालावल्यानंतर अलिगडच्या समाजवादी छात्र सभेचे जिल्हाध्यक्ष मुनताजीम किडवई यांनी अखिलेश यादव यांना पत्र लिहून मुलायम यांना किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुलायम सिंह यादव यांना आपली किडनी दान करायची असल्याचे मुनताजीम यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांच्यासाठी ही भाग्याची गोष्ट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राम गोपाल यादव आणि मेदांता हॉस्पिटलचे संचालक यांना पत्र लिहिल्याचे किडवई यांनी सांगितले.

मुलायम सिंह यादव यांना किडनीची गरज असेल तर मी माझी किडनी देण्यास तयार आहे, असे या पत्र त्यांनी रुग्णालयला दिले आहे.