AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वे मार्गावरुन जाणार, एकूण 5 ठिकाणी होणारी रेल्वे मार्गाशी भेट !

वडोदरा येथील हे काम खूपच आव्हानात्मक होते. कारण येथून बुलेट ट्रेनचा मार्ग अनेक सक्रीय रेल्वे ट्रॅकच्या वरुन जाणार आहे. या 14 पोर्टल बीम्सच्या उभारणीनंतर आता राजधानीच्या मेन लाईनवर सुमारे 40 मीटर लांबीचे कंपोझिट गर्डर्स लावले जाणार आहेत.

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वे मार्गावरुन जाणार, एकूण 5 ठिकाणी होणारी रेल्वे मार्गाशी भेट !
bullet train
| Updated on: Oct 12, 2026 | 11:55 PM
Share

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे काम वेगाने होत असून या मार्गाचा पहिला टप्पा गुजरात येथे साल 2027 रोजी सुरु होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला प्रचंड उशीर झाला आहे.या आधी पहिला टप्पा ( बिलीमोरा ते सुरत ) साल 2022 मध्ये सुरु होणार होता. या प्रकल्पाचे काम रखडण्यास महाविकास आघाडी सरकारचा धोरण लकवा जबाबदार असल्याचा आरोप भाजपा नेहमी करत आले आहे. मुंबई बुलेट ट्रेनचा एलिव्हेटेड मार्ग आता मुंबई ते दिल्ली राजधानी रेल्वेच्या मार्गावर वडोदरा येथून जाणार असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉरीडॉरने स्पष्ट केले आहे. एकूण पाच ठिकाणी भारतीय रेल्वेच्या मार्गांजवळून बुलेट ट्रेन जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट वडोदरा येथे मुंबई-दिल्ली राजधानीच्या मुख्य मार्गावरुन जाणार आहे. या भारतीय रेल्वेच्या मार्गावर 14 पोर्टल बीम्स उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या 14 पोर्टल बीम्सचे काम न केवळ मोठी उपलब्धी नव्हे तर वडोदरातील सध्याच्या रेल्वे नेटवर्कसोबत बुलेट ट्रेन कॉरिडॉरला जोडण्याच्या दिशेने देखील महत्वाचे पाऊल आहे. विशेष म्हणजे हे काम देशातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे.

वडोदरा येथील हे काम खूपच आव्हानात्मक होते. कारण येथून बुलेट ट्रेनचा मार्ग अनेक सक्रीय रेल्वे ट्रॅकच्या वरुन जाणार आहे. या 14 पोर्टल बीम्सच्या उभारणीनंतर आता राजधानीच्या मेन लाईनवर सुमारे 40 मीटर लांबीचे कंपोझिट गर्डर्स लावले जाणार आहेत. यासोबतच संवेदनशील भागात एलिवेटेड बुलेट ट्रेन कॉरिडॉरला पुढे वाढवण्यासाठीचे मोठे स्ट्रक्चरल काम पूर्ण झाले आहे.

असे झाले काम

वडोदरातील बुलेट ट्रेनचा हा भाग सुमारे 8.3 किलोमीटर लांब आहे. हा दाट लोकसंख्या आणि व्यस्त रेल्वे नेटवर्कच्या दरम्यान जात आहे. या दरम्याने बुलेट ट्रेन कॉरिडॉरला भारतीय रेल्वेच्या पाचही मार्गिकांना पार करावे लागते. ज्यात दोन मुख्य मार्गिका आहेत.  येथे बुलेट ट्रेनचा ट्रॅक दिल्ली – मुंबई राजधानीच्या मेन लाईनला तिरप्या दिशेने पार करतो. यासाठी खास स्ट्रक्चरची गरज होती. ज्यामुळे पर्याप्त क्लिअरन्स तयार होईल आणि सध्याच्या रेल्वे मार्गिका देखील सुरु राहतील, रेल्वे सेवा कोणत्याही व्यत्यया विना सुरक्षित सुरु राहिल. या आव्हान पाहाता दिल्ली-मुंबई राजधानीच्या मेन लाईनवर 14 पोर्टल बीम्स तयार केले आहे. यातील 10 बीम्स सूरतकडे वडोदरा बुलेट ट्रेन स्टेशन आणि विश्वामित्री रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आहे. तर 4 बीम्स अहमदाबादच्या दिशेने वडोदरा रेल्वे स्टेशन ते छायापूरी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान तयार करण्यात आले आहेत.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान