Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना…

मध्य रेल्वेच्या लोणावळा-कर्जत सेक्शनमध्ये ६ जुलै रोजी अतिवृष्टीने दरडी कोसळल्यानंतर मुंबई - पुणे रेल्वे वाहतूक बंद झाली होती. आता रेल्वेने ११०० कर्मचारी लावून ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु केले आहे.

Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना...
Mumbai to Pune railway updates
| Updated on: Jul 08, 2026 | 6:13 PM

दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर आता तब्बल ११०० मजूर आणि अधिकारी अहोरात्र लोणावळा-कर्जत सेक्शन येथे मुंबई ते पुणे रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जुंपले आहेत. ६ जुलै रोजी लोणावळा आणि कर्जत सेक्शनमध्ये बोरघाटात दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बाधित झाला होता. रुळांखालील खडी आणि माती वाहून गेल्याने तिन्ही मार्गिका ठप्प झाल्या होत्या आणि अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या तर उर्वरित ट्रेनना इगरपूरी दौंड मार्ग वळवण्यात आल्या होत्या. आता या तिन्ही मार्गिकेवर दुरुस्तीचे काम सुरु असून एक मार्गिका दुरुस्त करण्यात रेल्वेला यश आले आहे.

३० किमीच्या वेगाने ट्रेन रवाना …

ट्रेन क्रमांक 11013 LTT-Coimbatore Express ही पहिली ट्रेन काल रात्री १२.४५ वाजता ३० किमी वेगाच्या निर्बंधाने डाऊन दिशेला रवाना झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित दोन मार्गिकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मध्य रेल्वेने लोणावळा आणि कर्जत सेक्शनमध्ये ६ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून रेल्वे मार्गिका ठप्प झाल्या होत्या. तिन्ही मार्गिकांचे काम युद्ध पातळीवरुन काम सुरु आहे.

लोणावळा-कर्जत येथील मंकी हील, ठाकुरवाडी येथे लँड स्लाईड झाल्याने रेल्वे मार्गिकेचे काम सुरु झाले आहे. सुमारे ११०० कर्मचारी या युद्धपातळीवर काम सुरु आहे. काल रात्री पहिल्या ट्रॅकची दुरुस्ती पूर्ण झाली. त्यानंतर मंगळवारी रात्री १२.४५ वाजता पहिली डाऊन पॅसेंजर ट्रेन 11013 LTT-Coimbatore Express च्या दिशेने दर ताशी ३० किमी वेगाने रवाना करण्यात आली आहे. त्यानंतर 11041 Dadar-Sainagar Shirdi Express रात्री १.५७ वाजता रवाना करण्यात आली.

लोणावळा–कर्जत येथे अहोरात्र काम सुरु

लोणावळा–कर्जत दक्षिण-पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान १२१ आणि १२३ कि.मी. परिसरात अनेक ठिकाणी या दरडी कोसळल्या. दरडी सोबत मोठा राडारोडा रुळांवर येऊन पडला. मोठाले दगड आणि माती वाहून आल्याने रुळांची अवस्था वाईट झाली आहे. या ठिकाणांवर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. ११०० हून अधिक कामगार आणि कर्मचारी रेल्वे मार्गिका दुरुस्त करण्याचे काम भरपावसात करीत आहेत. एक मार्गिका दुरुस्त झाल्याने तीन ट्रेन रवाना झाल्या आहेत. मात्र, दोन मार्गिकांचे काम अजूनही शिल्लक असल्याने त्याचे काम अहोरात्र सुरु आहे.

 

Follow Us