AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय

मोठी बातमी समोर येत आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फूड अँन्ड ड्रग्ज विभागात ड्रग्ज इंस्पेक्टर ग्रुप बी या पदाच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्द, पेपर लीकचा आरोप झाल्यानंतर मोठा निर्णय
ड्रग इंस्पेक्टर परीक्षा रद्दImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 26, 2026 | 1:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. नीटसह इतर काही परीक्षेचे पेपर लीक झाल्याची प्रकरण समोर येत आहेत. नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा नीटची परीक्षा घेण्यात आली होती. दरम्यान त्यावरून देशभरात वातावरण तापलेलं असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फूड अँन्ड ड्रग्ज विभागात ड्रग्ज इंस्पेक्टर ग्रुप बी या पदाच्या भरतीसाठी आयोजित करण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरमध्ये अनियमितता आणि पेपर लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडून सुरू करण्यात आला होता. या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता. त्यानंतर आता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ड्रग इंस्पेक्टर ग्रुप ब भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने 29 जुलाई 2025 जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानतंर मार्च 2026 ला चाळणी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा राज्यातील सहा विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली होती. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. मात्र या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा तसेच पेपर लीक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांकडे परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच पोहोचल्याचा आरोप होत होता. विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या संदर्भात 27 जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं आढळून आलं की, ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका विद्यार्थ्याकडे या परीक्षेचा प्रश्नसंच पोहोचला होता, आणि त्याला त्याचा या परीक्षेत फायदा देखील झाला.

त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगने घेतला आहे. दरम्यान आता ही परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात लवकरच अधिकृत सूचना जारी केली जाणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा या परीक्षेसाठी अर्ज करण्याची गरज नाहीये, तसेच त्यांना कोणतंही शुल्क भरण्याची गरज नाहीये.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे