Cyclone Murasu : अर्नबनंतर आता मुरासू चक्रीवादळाचं संकट, पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; नेमका अलर्ट काय?

मुरासू चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता ओडिशा, आंध्रप्रदेश तसेच जवळपासच्या राज्यात अलर्ट जारी करण्यात आलाय. समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात करण्यात आलीय.

Cyclone Murasu : अर्नबनंतर आता मुरासू चक्रीवादळाचं संकट, पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज; नेमका अलर्ट काय?
murasu cyclone rain update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2026 | 8:11 PM

Murasu Cyclone Update : सध्या देशावर एल निनोचं संकट आहे. या संकटामुळे महाराष्ट्रासह भारतात यंदा कमी पाऊस झाला. महाराष्ट्रात तर 304 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. सध्या अर्नब चक्रीवादळमुळे राज्यात तसेच देशात काह ठिकाणी पाऊस पडलाय. या चक्रीवादळाचे संकट आता पूर्णपणे संपलेले नाही. असे असतानाच आता बंगालच्या खाडीत नवे संकट निर्माण झाले आहे. बंगालच्या खाडीत नवे चक्रीवादळ निर्माण झाले आहे.

3 नोव्हेंबर रोजी समुद्रकिनाऱ्यावर धडकणार

नव्याने निर्माण होत असलेल्या वादळाचे नाव ‘मुरासू’ असे आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ येत्या 3 नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकू शकते. त्यामुळेच आंध्रप्रदेश, ओडिशा या दोन्ही राज्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय. या दोन्ही राज्यांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या मुरासू चक्रीवादळाची सुरूवात बंगालच्या खाडीतील दक्षिण-पश्चिमी भागात झाली होती.

Loading...

मुरासू चक्रीवादळ सध्या 660 किमी लांब

मुरासू चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता ओडिशा, आंध्रप्रदेश तसेच जवळपासच्या राज्यात अलर्ट जारी करण्यात आलाय. समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात करण्यात आलीय. ताज्या अपडेटनुसार मुरासू चक्रीवादळ सध्या विशाखापट्टनमपासून 660 किमी लांब आहे. 3 नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे.

भारतातील कोणकोणत्या राज्यांना अलर्ट?

मुरासू हा शब्द तमिळ भाषेतून आला आहे. या शब्दाचा अर्त नगाडा म्हणजेच ढोल असा होतो. मुरासू हे चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिम दिशेत वेगाने पुढे सरकत आहे. 2 नोव्हेंबरपासूनच आंध्रप्रदेशमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू शकतो. या राज्यात 2 नोव्हेंबरला वादळी वारे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायलसीमा या भागात अतिमुसळधार पाऊस तर यानम या भागात 100 ते 120 किमी प्रतीतास या वेगाने वारू वाहू शकतात.

दरम्यान अर्नब या चक्रीवादळाच्या तुलनेत मुरासू हे चक्रीवादळ कमी विध्वंसक असणार आहे. अर्नब चक्रीवादल जेव्हा आंध्रप्रदेशच्या सागरी किनाऱ्यावर आले होते तेव्हा या वादळाचा वेग 130 किमी प्रतितास होता. मुरासू या वादळाचा वेग 100 ते 120 किमी प्रतितास असू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us