मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असावा, असं का म्हणाले रामदेव बाबा? वाचा…
कावड यात्रेदरम्यान अनेक मुस्लिम लोक ढाबे आणि हॉटेलची नावे बदलून आपला व्यवसाय करतात. यावर योगगुरू रामदेव बाबा यांनी भाष्य केले आहे.

कावड यात्रा पुढील आठवड्यापासून सुरु होणार आहे. यासाठी तयारी जोरात सुरु आहे. या यात्रेच्या मार्गावर असणाऱ्या अनेक मुस्लिम लोक आपल्या हॉटेलची नावे बदलली जातात, यावर योगगुरू बाबा रामदेव यांनी भाष्य केले आहे. सर्व मुस्लिमांचे पूर्वजही हिंदू आहेत, त्यामुळे त्यांची नावे बदलण्यात काही अर्थ नाही. नाव बदलणे व्यावहारिक आणि धार्मिकदृष्ट्या चुकीचे आहे असं रामदेव बाबांनी म्हटले आहे.
सर्व मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असला
समोर आलेल्या माहितीनुसार, कावड यात्रेदरम्यान अनेक मुस्लिम लोक ढाबे आणि हॉटेलची नावे बदलून आपला व्यवसाय करतात. हरिद्वारमधील ढाबे किंवा हॉटेलचे नाव बदलण्याचा वाद सुरू आहे. याबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “जसा आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान आहे, त्याचप्रमाणे सर्व मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे नाव बदलण्यात काही अर्थ नाही’
सर्व मुस्लिमांचे पूर्वज हिंदू
पुढे बोलताना रामदेव बाबांनी सांगितले की, “सर्व मुस्लिमांचे पूर्वजही हिंदू होते, त्यामुळे नाव बदलण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकाने आपले नाव आहे तेच ठेवावे, जर लोकांची इच्छा असेल तर ते हॉटेल किंवा ढाब्यावर येऊन जेवण करतील. नाव बदलून व्यवसाय करणे व्यावहारिक आणि धार्मिकदृष्ट्या चुकीचे आहे.”
दरम्यान, उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील कावड यात्रेच्या मार्गावर असलेल्या पंडित जी वैष्णो ढाब्याच्या मालकाला वादामुळे ढाबा बंद करावा लागला होता. त्यामुळे पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मराठी आणि हिंदी वादावरही रामदेव बाबांचे भाष्य
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदीबाबत वाद सुरु आहे. यावर बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, “देशातील सर्व भाषांसोबत मराठी भाषेचाही आदर केला पाहिजे. त्यामुळे हिंदूंनी वेगवेगळ्या भाषा आणि पंथांच्या आधारावर आपापसात भांडू नये. यामुळे सनातन धर्माला आणि राष्ट्रीय एकतेला हानी पोहोचते.”