9 वर्षात मुस्लिम होतील बहुसंख्य, हिंदूंची संख्या घटणार, तो दावा काय?

Pew Research Centre: जगात धार्मिक लोकसंख्येविषयी प्यू रिसर्च सेंटरने एक मोठा दावा केला आहे. त्यानुसार, आगामी दशकात धार्मिक लोकसंख्येत मोठ्या बदलाची नांदी समोर येत आहे. काय आहे याविषयीचा अहवाल, काय आहे त्यातील दावा?

9 वर्षात मुस्लिम होतील बहुसंख्य, हिंदूंची संख्या घटणार, तो दावा काय?
9 वर्षात मुस्लिम होतील बहुसंख्य, हिंदूंची संख्या घटणार, तो दावा काय?
| Updated on: Nov 19, 2026 | 8:27 AM

Pew Research Centre: जगात धार्मिक लोकसंख्येच्या आलेखात बदल होणार आहे. प्रसिद्ध संशोधन संस्था प्यू रिसर्च सेंटरने याविषयीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत जगात इस्लाम धर्माचे पालन करणार्‍यांची संख्या ख्रिश्चन धर्मियांपेक्षा वाढणार आहे. इस्लाम अनुयायांची संख्या बहुसंख्य असेल. प्यू रिसर्च सेंटर गेल्या 25 वर्षांपासून धर्माच्या आधारावर जागतिक लोकसंख्येचा अभ्यास करत आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये इतर धर्मियांचा टक्का घसरण्याची भीती ही व्यक्त करण्यात आली आहे.

आकडेवारीतील दावा काय?

Loading...

या अहवालानुसार, जगात इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्माच्या अनुयायांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पण मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दरात लक्षणीय बदल दिसत आहे. 2020 मध्ये जगात सुमारे 227 कोटी ख्रिश्चन आणि 220 कोटी मुस्लिम होते. नव्या दाव्यानुसार, 2035 पर्यंत जागतिक मुस्लिम लोकसंख्या 257 कोटींपर्यंत पोहचू शकते. तर ख्रिश्चनांची संख्या 252 कोटी इतकी असेल. असाच कल कायम राहिला, तर 2070 पर्यंत जगात मुस्लिमांची लोकसंख्या 360 कोटींचा टप्पा ओलंडण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. तर ख्रिश्चन अनुयायांची लोकसंख्या 300 कोटींच्या घरात असेल.

नास्तिकांची संख्या लक्षणीय वाढणार

तर या अभ्यासात अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जगातील अनेक देशांमध्ये स्वतःला नास्तिक म्हणवणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरित्या वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याही धर्माशी संबंध न ठेवणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा लोकांना संशोधनात नोन्स (Nones) असं म्हटलं आहे. चीनचा अपवाद वगळता जगातील इतर देशांमध्ये अशा धर्मनिरपेक्ष आणि नास्तिक लोकांची संख्या 2070 पर्यंत 18 कोटींहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे.

अमेरिका आणि कॅनडात ख्रिश्चन घटणार

पाश्चात्य देशांमध्ये कोणताही धर्म न मानणाऱ्या लोकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. अहवालानुसार, येत्या 40 वर्षात अमेरिकेत ख्रिश्चन बहुसंख्य नसतील. सध्या अमेरिकेच्या लोकसंख्या ख्रिश्चन धर्मियांची टक्केवारी 62 टक्के आहे. 2065 पर्यंत हा आकडा 50 टक्क्यांच्या खाली येऊ शकतो. तर कॅनडा या देशातही 2030 पर्यंत ख्रिश्चन लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हिंदूची संख्या घटणार

भारत आणि जगभरातील हिंदूंची एकूण लोकसंख्या 2020 मध्ये 1.2 अब्ज इतकी होती. इतर धर्मियांच्या लोकसंख्येचा वेग पाहता हिंदूंची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढणार नाही. अहवालातील दाव्यानुसार 2070 पर्यंत ही संख्या 1.4 अब्ज इतकीच वाढणार आहे. तर येत्या काही दशकांपर्यंत हिंदू भारतात बहुसंख्य असतील, पण धार्मिक परीघ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us