तामिळनाडूमधला ‘तो’ भाग इंदिरा गांधी यांनी कुणाला दिला? नरेंद्र मोदी यांचा गंभीर आरोप

| Updated on: Aug 10, 2023 | 9:26 PM

"विरोधकांकडून देशाला संभ्रमात पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कच्छतिवू काय आहे ते सांगा. कच्छतिवू कुठे आहे ते सांगा", असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिलं.

तामिळनाडूमधला तो भाग इंदिरा गांधी यांनी कुणाला दिला? नरेंद्र मोदी यांचा गंभीर आरोप
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदान पद्धतीने फेटाळण्यात आला. या मतदानाच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल अडीच तास भाषण केलं. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर सडकून टीका केली. “लोकसभेच्या सभागृहात भारत मातेबद्दल जे म्हटलं गेलंय त्यामुळे प्रत्येत भारतीय नागरिकाच्या मनाला ठेच लागली आहे. मला माहिती नाही की, काय झालंय? सत्तेशिवाय यांची अशी अवस्था झालीय, ते अशी भाषा वापरत आहेत. काही लोकांकडून भारत मातेचा मृत्यू असा उल्लेख केला जातोय”, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी खेद व्यक्त केला.

“हे तेच लोक आहेत जे कधी लोकशाहीची हत्या झाल्याची भाषा करतात, कधी संविधानाच्या हत्येची गोष्ट करतात. त्यांच्या मनात जे आहे तेच त्यांच्या कृतीतून समोर येतं, मी हैराण आहे. हे बोलणारे कोण लोक आहेत? हे विसरले आहेत का 14 ऑगस्ट आजही आपल्यासमोर त्या किंचाळ्या घेऊन डोळ्यांसमोर येतो. या लोकांनी त्यावेळी भारत मातेचे तीन तुकडे केले. आता हे लोक कोणत्या तोंडाने असं बोलायची हिंमत करतात?”, असा सवाल नरेंद्र मोदींनी केला.

‘कच्छतिवू’ कुठे आहे? नरेंद्र मोदींचा काँग्रेसला सवाल

“ज्या वंदे भारत गीताने देशाला प्रेरणा दिली, पण राजकाणासाठी या लोकांनी वंदे भारत गीताचेदेखील तुकडे केले. हे लोक ईशान्य भारताला तोडण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना पाठिंबा देतात”, असा घणाघात नरेंद्र मोदींनी केला. “विरोधकांकडून देशाला संभ्रमात पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कच्छतिवू काय आहे ते सांगा. कच्छतिवू कुठे आहे ते सांगा. डीएमकेवाले त्यांचे सरकार, त्यांचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री मला पत्र लिहून विनंती कारत आहेत की कच्छतिवू वापस आणा. हे कच्चतिवू आहे काय? कुणी दिलं?”, असा सवाल मोदींनी केला.

‘काँग्रेसचा इतिहास भारत मातेला छिन्नविछिन्न करण्याचा’, मोदींची टीका

“तामिळनाडूच्या पुढे, श्रीलंकेच्या आधी एक बेट कुणीतरी कोणत्या तरी देशाला दिलं होतं. केव्हा दिलं होतं? तेव्हा ही भारत माता नव्हती? भारत मातेचा तो भाग नव्हता? तेव्हा कोण होतं? माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात ते झालं होतं. काँग्रेसचा इतिहास भारत मातेला छिन्नविछिन्न करण्याचा राहिलेला आहे. आता काँग्रेसचा भारत मातेप्रती काय प्रेम येतंय?”, अशी टीका मोदींनी केली.

नरेंद्र मोदींनी मिझोरामची घटना सांगितली

“मी दोन घटना सांगणार आहे. पहिली घटना 5 मार्च 1966, या दिवशी काँग्रेसने मिझोराममध्ये असहाय नागरिकांवर आपल्या वायुसेनेच्या मदतीने हल्ला केला होता. गंभीर वाद झाला होता. काँग्रेसवाल्यांनी उत्तर द्यावं. ती वायूसेना दुसऱ्या देशाची होती का? मिझोरामचे नागरीक भारताचे नागरीक नव्हते का? त्यांची सुरक्षेची जबाबदारी भारत सरकारची होती की नाही?”, असा सवाल मोदींनी केला.

“वायूसेनेच्या माध्यमातून निर्दोष नागरिकांवर हल्ला करवण्यात आला. आजही मिझोराममध्ये 5 मार्चला पूर्ण राज्य शोक व्यक्त करतो. या लोकांनी कधीच घाव भरण्याचे प्रयत्न केले नाहीत. काँग्रेसने या सत्याला देशापासून लपवलं आहे. आपल्याच देशावर हल्ला करायचा?”, असा सवाल मोदींनी केला.

नरेंद्र मोदींनी रेडिओवरील ‘त्या’ भाषणाचा उल्लेख केला

“दुसरी घटना 1962ची आहे. त्यावेळी रेडिओ प्रसारण करण्यात आलं होतं. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1962 मध्ये जेव्हा देशावर चीनकडून हल्ला सुरु होता, देशाच्या प्रत्येक भागातील लोक अपेक्षा ठेवून होते. त्यांना काही मदत मिळेल, जीवाचं रक्षण होईल, अशा बिकट परिस्थितीत दिल्लीत बसलेले नेते पंडित नेहरु यांनी रेडियोवर भाषण केलं होतं. नेहरुंचं त्या भाषणाचा खेद आजही संपूर्ण आसाम व्यक्त करतो. लोहिया यांनी नेहरुंवर त्यावेळी टीका केली होती. नेहरुंनी जाणूनबुजून पूर्वोत्तर भारताचा विकास केला नाही”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.