Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन

| Updated on: Jan 09, 2022 | 6:35 PM

मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे.

Narendra Modi : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान मोदींची अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक, देशातील स्थितीवर मंथन
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा विळखा (Corona Outbreak) अधिक घट्ट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशातील कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली. मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. देशातील सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचे रेकॉर्ड ब्रेक आकडे समोर येत आहेत. अशावेळी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशभरात 1 लाख 59 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 90 हजारापेक्षा अधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत या बैठकीला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

देशात ओमिक्रॉनचे 3 हजार 623 रुग्ण

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनचे आतापर्यंत 3 हजार 623 रुग्ण आढलून आले आहेत. ओमिक्रॉनची लागण झालेलेय 1 हजार 409 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 1 हजार 9 तर दिल्लीत 513 रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

मांडविय सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीनंतर उद्या केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय हे उद्या देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनीच त्याबाबत मांडविय यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे उद्या केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सर्व राज्यांच्या आरोगमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोणत्या राज्यात ओमिक्रॉनचे किती रुग्ण?

कर्नाटक – 441
राजस्थान -373
केरळ – 333
गुजरात – 204
तामिळनाडु – 185
हरियाणा – 123
तेलंगणा – 123
उत्तर प्रदेश – 113
ओडिशा – 60
आंध प्रदेश – 28
पंजाब – 27
पश्चिम बंगाल – 27
गोवा – 19
आसाम – 9
मध्य प्रदेश – 9
उत्तराखंड – 8
मेघालय – 4
अंदमान-निकोबार – 3
चंदीगढ – 3
जम्मू-काश्मीर – 3
पुद्दुचेरी – 2
छत्तीसगढ – 1
हिमाचल प्रदेश -1
लडाख – 1
मणिपुर – 1

इतर बातम्या :

गिरीश महाजनांच्या अडचणी वाढणार? पुणे पोलिसांचं पथक तपासासाठी जळगावात! नेमकं प्रकरण काय?

Video : ‘घर की मुर्गी दाल बराबर’, शिवसेना आमदाराची नाराजी जाहीर व्यासपीठावर उघड