AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या सत्तेसाठी काँग्रेस नेत्याच्या घरी पहिली बैठक; सुधीर मुनगंटीवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ

Sudhir Munganttiwar on BJP Mayor: चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक जागा असूनही काँग्रेसला भाजपने अस्मान दाखवले. सायलंट खेळी करत उद्धव सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली. पण आता या खेळात काँग्रेसच्या एका नेत्याची पण मोठी भूमिका असल्याचा खुलासा सुधीरभाऊंनी करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या सत्तेसाठी काँग्रेस नेत्याच्या घरी पहिली बैठक; सुधीर मुनगंटीवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकारणात खळबळ
सुधीर मुनगंटीवार, राहुल पुगलियाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Feb 11, 2026 | 3:46 PM
Share

Sudhir Munganttiwar on Rahul Pugliya: चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपमध्ये जसे दोन गट आहेत. तसेच काँग्रेसमध्ये पण दुही आहे. ती जगजाहीर आहे. महापालिकेत सर्वाधिक 27 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण राजकीय सारीपाटावर काँग्रेसला सत्तेचं राजकारण जमवता आलं नाही. काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्यात गुंतलेले असतानाच भाजपने डाव साधला. उद्धव सेनेला हाताशी धरत काँग्रेसचा फियास्को केला. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर ठरले. पण या खेळात काँग्रेसच्या एका नेत्याची मोठी भूमिका होती असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

काँग्रेसची सत्ता नाही

काँग्रेसने महानगरापालिकेत 27 जागा जिंकल्या. पण विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये अटीतटीचा सामना दिसला. हा वाद पार दिल्लीपर्यंत गेला. संख्याबळ अधिक असल्याने आणि उद्धव सेनेशी चर्चा सुरू असल्याने, जनविकास सेनेशी चर्चा होत असल्याने काँग्रेसचा महापौर होणार असं मानल्या जात होतं. त्यादृष्टीनं बोलणी, चर्चा सुद्धा सुरू होती. तर दुसरीकडं भाजपनं ऐनेवळी गेम पालटवला. काँग्रेसच्या दुहीचा फायदा घेतला. उद्धव सेना इथं किंगमेकरच्या भूमिकेत होती. उद्धव सेनेला सव्वा वर्षांचं महापौर पदाची ऑफर देण्यात आली आणि गेम पालटला. तर मतदानावेळी वंचितचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. तर MIM नगरसेवक तटस्थ राहिला. चुरशीच्या निवडणुकीत भाजपने ठाकरे सेनेच्या पाठिंब्याने महापौर पदाला गवसणी घातली. काँग्रेसच्या तोंडातील घास भाजपने हिसकावला.

राहुल पुगलिया यांच्या घरी बैठक

भाजपच्या या यशस्वी खेळीमागे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार हे मानले जातात. या राजकीय खेळीविषयी सुधीरभाऊ नेहमीप्रमाणे मनमोकळे बोलले. काँग्रेस आणि भाजपला दोघांनाही बहुमत नव्हतं. त्यामुळं संधीचं आम्ही सोनं केलं असे मुनगंटीवार म्हणाले. नंदू धागरकर, प्रशांत नानव यांचे आभार मानतानाच त्यांनी विशेष करून काँग्रेसचे नेते राहुल पुगलिया यांचे जाहीर आभार मानले.

राहुल पुगलिया हे जरी काँग्रेस पक्षाचे असले तरी त्यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी पहिली बैठक त्यांच्याच घरी घडवून आणली होती असा गौप्यस्फोट सुधीरभाऊंनी केला. त्यातून एक चांगलं वातावरण चंद्रपूरमध्ये तयार झालं. आमचं कुटुंब हे इतक्या वर्षांपासून जरी काँग्रेसचं असलं तरी जो विकास आम्हाला चंद्रपूरमध्ये हवा आहे तो तुम्हीच करू शकाल हा विश्वास आम्हाला आहे. आमचं हृदय काँग्रेसचं आहे. पण महापौर पदासाठी आम्ही तुम्हाला मदत करू असं पुगलिया यांनी सांगितल्याचा दावा सुधीरभाऊंनी केला.

Follow Us
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर... पक्षाने दिली राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर